loader image
[ays_poll id=7]

अनारक्षित रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये मासिक पासधारक करू शकतील प्रवास

Feb 25, 2022

मासिक पासधारकांना अनारक्षित रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये प्रवास करण्यात येणार असल्याचे पत्र रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीस दिले आहे. मात्र आरक्षित रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये सर्वसामान्यांचा प्रवास कधी सुरू होणार याकडे लक्ष लागून आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने ८ ऑक्टोबर २०२१ रोजी काही वर्गांना काही अटींवर पॅसेंजर रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्यास मुभा दिली. त्यात पूर्ण लसीकरण झालेले तसेच सक्षम व अधिकृत वैद्यकिय अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र असल्यासच मासिक पास धारक ( सिझन तिकीट ) हा प्रवास करता येणार आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या कोविड संदर्भात सर्व अटी हा प्रवास करतांना बंधनकारक राहणार आहेत.

तिकीट खिडकीवरून वितरीत केल्या जाणार्‍या मासिक पास तिकीटांवर फक्त अनारक्षित पॅसेंजर गाड्यांसाठी हे मासिक पास ( सिझन तिकीट )आहे असा शिक्का राहणार आहे. तसेच ज्या मेल एक्सप्रेस गाड्यांना परवानगी असेल त्या गाड्यांचा उल्लेखही त्यावर स्पष्टपणे केला जाणार आहे.

मध्य रेल्वेच्या मनमाड -मुंबई पंचवटी एक्सप्रेससह सर्व डेमू पॅसेंजर ट्रेन्सचा यात समावेश आहे. आता पंचवटीसह भुसावळ-इगतपुरीेमेमू , पुणे पॅसेंजर, अजिंठा एक्सप्रेस, धर्माबाद एक्सप्रेस या गाड्यांमधून प्रवास करण्यास पासधारकांना रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील जिव्हाळ्याच्या व प्रवासीप्रिय असलेल्या इतर एक्सप्रेस गाड्या आरक्षित असल्याने या गाड्यांतून यापुढेही रेल्वे पासधारकांना प्रवास करण्यास बंदी राहणार आहे. या गाड्यांतून किंवा इतर आरक्षित डब्यांमधून पासधारकांनी प्रवास केल्यास त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार असल्याची माहिती देखील प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
.