Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आदि स्ट्रायकर्स ठरला अंडर 17 टर्फ टुर्नामेंट सीजन 02 विजेता संघ. जबरदस्त संघ उपविजेता.

Feb 26, 2022

रोटरि क्लब व भुमी क्रिकेट ॲकॅडमी यांच्या माध्यमातुन अंडर 17 टर्फ टुर्नामेंट पार पडला ज्यात आदि स्ट्रायकर्स ( संघमालक विक्रम साहु / ऋषीकेष दराडे ) या संघाने बाजी मारली. स्पर्धेतील अंतिम सामण्यात जबरदस्त ( मा. सनीभाऊ फसाटे ) या संघाला नमवुन त्यांनी हा खिताब पटकवला. अंतिम सामन्याचा मानकरि आदि स्ट्रायकर्स संघाचा कर्णधार कैफ शेख हा ठरला तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ फलंदाजही कैफ शेख ठरला. जबरदस्त संघातील रोहन गायकवाड याने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ गोलंदाजाचा खिताब मिळविला. स्पर्धेतील प्रथम पारितोषीक 11,000/- मा. ईम्रानभाई मोमीन यांच्यातर्फ देण्यात आले जे कुमारी नाबिया इरफान मोमिन यांच्या हस्ते विजेत्या संघास प्रदान करण्यात आले तसेच मा. भुषण शर्म / कौशल शर्मा ( रोटरि क्लब मनमाड ) यांच्या सौजन्याने 5,000/- दुसरे पारितोषीक उपविजेत्या संघास देण्यात आले. क्रीडांगण मनमाड यांच्या सौजन्याने सर्वोत्कृष्ट फलंदाज , सर्वोत्कृष्ट गोलंदाज व अंतिम सामन्याचा मानकरी हे तीनही पुरस्कारांना रोख पारितोषिक देण्यात आले.

कार्यक्रमास माननीय इरफान भाई मोमीन , भूषण शर्मा , कौशल शर्मा , संजय चोपडा , वाल्मिक रोकडे , राहुल साबळे , मनोज ठोंबरे सर , शेख रब्बानी सर , विक्रम साहू , ऋषिकेश दराडे , सनी फसाटे , सरफराज शेख , शोएब शेख , आकाश वाघमारे , रुद्र पाटेकर , कलश पाटेकर या सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभली. सामन्यांमध्ये पंच म्हणून रोहित पवार यांनी कामगिरी पार पाडली व कार्यक्रमाचे समालोचन शेख रब्बानी सर व मनोज ठोंबरे सर यांनी पार पाडले तसेच स्पर्धेचे यशस्वी नियोजन उत्कृष्टरित्या वाल्मिक रोकडे , रोहित पवार व सिद्धार्थ रोकडे यांच्या मार्फत करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]