Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंती निमित्त ‘बौद्धिक स्वामित्व हक्क’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

Mar 1, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर व अदिवासी सेवा समिती या संस्थांचे संस्थापक, थोर स्वातंत्र्यसेनानी, कुळ कायद्याचे जनक, शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील अभिवादनपर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कर्मवीर हे वकिली व्यवसाय करत असताना वकिली व्यवसाय सोडून त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय सहभाग नोंदवून कारावासही भोगला तसेच शिक्षण, सहकार व राजकारण या क्षेत्रात स्वत:ची विद्वत्ता सिद्ध केली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीत सिंहाचा वाटा, शेतकी, वन व महसूल खात्याचे मंत्री असताना शेतक-यासाठी वरदान ठरलेला ऐतिहासिक कूळकायदा तयार करून त्याची अंमलबजावणी केली. सहकाराचे कार्यतत्व स्वीकारून नाशिक जिल्हा बँक, खरेदी विक्री संघ, गिरणा सहकारी साखर कारखाना, शेतकी संघ अशा अनेक संस्थांची उभारणी केली तसेच आदिवासी व ग्रामीण भागातील मूलांच्या शिक्षणासाठी आदिवासी सेवा समिती व महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थांची स्थापना करुन नाशिक जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली. म्हणून कर्मवीर भाऊसाहेब हिरे हे समाजवादाचे खरे पुरस्कर्ते आहेत. तसेच मनमाड महाविद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘बौद्धिक स्वामित्व हक्क’ या विषयावर गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्यातर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेत डॉ. जयवंत भदाणे यांनी पेटंट, काॅपीराइट, ट्रेडमार्क, भौगोलिक स्थानाचे महत्त्व बौद्धिक स्वामित्व हक्कात कसे आहे. याविषयी सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ पी जी आंबेकर, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या ज्योती पालवे, पर्यवेक्षक डॉ सतीश तांबे, प्रा. विठ्ठल फंड, कुलसचिव समाधान केदारे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षाराणी पेडेकर, प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचे परिचय डॉ आर एस काळे व व आभार नॅक समन्वयक डॉ मिलिंद अहिरे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]