मनमाड शहर आणि परिसरात चोऱ्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.मागील आठावड्याची पोस्ट ऑफिस शेजारील धाडसी घरफोडीची घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची १९ ग्राम वजनाची सुमारे ७० हजार रुपयांची पोत चोरटयांनी चोरून नेली.याप्रकरणी मनमाड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की येथील कॅम्प विभागातील वेलंकणी नगर मधील प्लॉट क्रमांक २२ येथील किराणा दुकानात चंद्रकला चारुदत्त कारंडे ह्या बसलेल्या असताना दोघे अज्ञात काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आले.त्यातील एकाने दुकानात येऊन, ‘ गायछाप द्या “असे बोल ला व कारंडे ह्या वळताच सदरील चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; पहिल्याच दिवशी दोन्ही मतदारसंघात एकूण तीन अर्ज दाखल
नाशिक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता नाशिक जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या...








