Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भय भ्रष्टाचार कॉपीमुक्त परीक्षा ही विद्यार्थी पालक शिक्षकांची नैतिक जबाबदारी अध्यापकभारतीच्या परिषदेत समुपदेशकांची चा सुर

Mar 3, 2022

विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वर्षातील ज्ञानार्जन,ज्ञानप्राप्तीचे मूल्यमापन काही तासाच्या अत्यल्प वेळेमध्ये करणे अत्यंत कठीण आहे परंतु आपल्याकडील शैक्षणिक वर्षात शिक्षण व्यवस्थेमध्ये होणारे मूल्यमापन आणि त्यातून त्या विद्यार्थ्यांच्या करिअर अर्थात भविष्यकालीन जीवनशैलीचा धांडोळा यावर त्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व भावी जीवनाचे यश-अपयश निश्चित केली जाते अशा अवस्थेत विद्यार्थ्यांचीच नाही तर एकूण सर्व संबंधित घटकांची परीक्षा असते विद्यार्थ्यासोबत पालक,शिक्षक,समाज शासन प्रशासनाची धोरणे ही कारणीभूत ठरत असतात म्हणून विद्यार्थ्यांमध्ये आशा परीक्षांच्या कालावधीमध्ये ताण-तणाव येणे आणि त्यातून काही अपवादात्मक स्थितीत गैरमार्गाचा अवलंब होणे अशाही घटना घडतात म्हणून विद्यार्थ्यांचा न्यूनगंड घालवत

भय भ्रष्टाचार कॉपीमुक्त परीक्षा ही विद्यार्थी पालक शिक्षकांची नैतिक जबाबदारी असल्याचा मत अध्यापकभारतीने आयोजित केलेल्या भय भ्रष्टाचार कॉपी मुक्त परिषदेत समुपदेशकांनी व्यक्त केले.
कौटुंबिक वातावरण परीक्षाकाळात सकारात्मक ठेवावे,परीक्षार्थींची फाजील लाड अनाठाई मागण्या मर्यादित कराव्यात,मुलांना ताण तणावातून बाहेर काढण्यासाठी पालक नातेवाईक,सामाजिक घटक यांनी अपेक्षांचे ओझे कमीत कमी राहील परीक्षा काळात त्याची भीती कमी कशी होईल याकडे पालकांनी लक्ष द्यावे. पालक नातेवाईक,शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे परीक्षा काळात मित्र बनावे त्यांच्याशी सुसंवाद करावा ज्याप्रमाणे युद्धावर जाण्याआधी एखादा सैनिक युद्धनीतीची पूर्वतयारी अतिशय मन लावून मेहनतीने करतो तसेच आपल्या हाती असलेल्या वर्षभर काळात आपण विद्यार्थी म्हणून परिक्षेला आवश्यक असलेली सगळी तयारी करावी तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा ताण तणाव येणार नाही असे मत अध्यापक भारती या राष्ट्रीय बालक विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भय भ्रष्टाचार व कॉपीमुक्त परीक्षा परिषदेत मान्यवरांनी बोलतांनी व्यक्त केली.
शांततेच्या काळात जास्तीत जास्त घाम गाळला म्हणजे युद्धाच्या प्रसंगी जास्त रक्त सांडावे लागत नाही या धोरण नीतीने विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ज्ञानार्जन करत असताना अभ्यासाचे सातत्य नियोजन सुसूत्रता परीक्षेचे स्वरूप प्रश्नपत्रिका कृती पत्रिकेचा स्वरूप,गुणदान पद्धती याचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक असते तो जर वर्षभर सातत्याने नियोजित पद्धतीने केला तर ऐन परीक्षेच्या वेळी आपल्यावर कोणतेही ताण तणाव किंवा बाह्य घटकातील वातावरणातील बदल आपल्या ज्ञानार्जनावर करत नाही असे मत यावेळी बोलताना समुपदेशक प्रशांत पाटील सर यांनी व्यक्त केले.परीक्षेत येणारी भीती हे शिस्त आणि नियोजनाच्या अभावामुळे नेते ऐन वेळी अनेक द्विधा मनस्थिती मध्ये विद्यार्थी जातो आणि त्यामुळेच भय निर्माण होते भय चिंताचा उगम मुळात अज्ञानातून होत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी वार्षिक नियोजन हे सातत्याने जपावे अभ्यास करणारे मित्र आणि पालकांची मैत्री करिअर संबंधित सुरूवातीपासूनच जाणीवपूर्वक माहिती मिळविणे या गोष्टीकडे पालक विद्यार्थी व शिक्षक यांनी समन्वयाने पाहिले पाहिजे केवळ मात्र विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेच्या गुणावरून त्याची करिअर योग्यता ठरवण्यापेक्षा त्या विद्यार्थ्याच्या अभिरूची अभियोग्यता कौशल्य या गोष्टींचा बारकाईने अभ्यास निरीक्षण पालक विद्यार्थी यांनी करावे असे मत समुपदेशक सुनील अहिरराव सर यांनी व्यक्त केले उत्तर पत्रिका व कृतीपत्रिका ह्या नीट समजून योग्य ती माहिती योग्य ठिकाणी भरणे हे अत्यंत आवश्यक असून दहावी-बारावीच्या परीक्षेत सर्वसाधारणपणे अर्धा तास अगोदर उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना माहिती भरण्यासाठी पुरवल्या जातात त्यावेळी योग्य ती माहिती योग्य ठिकाणी उत्तरपत्रिकेत भरणे सुवाच्य अक्षर उत्तराची मुद्देसूद मांडणी या गोष्टीकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे कुठल्याही विषयाची कृतीपत्रिका सोडवत असताना विद्यार्थ्यांनी प्रश्न नीट समजून घ्यावा त्याशिवाय उत्तर लिहू नये आपल्याला काठिण्य पातळी कमी असलेले अर्थात सोपे वाटणारे प्रश्न आधी सोडवून नंतर कठीण किंवा अवघड वाटणारे प्रश्न सोडविण्यासाठी घ्यावेत असे मत समुपदेशिका चंपा रणदिवे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले जीवन पानपाटील यांनी अध्यापकभारती च्या वतीने होत असलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थी पालक शिक्षक यांच्या समन्वयाचा परीक्षेच्या काळात अभाव कमी भासू नये आणि विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या भय भीती आणि भ्रष्टाचार कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रोत्साहित करावे असे मत मांडले परिषदेचे निमंत्रक अध्यापकभारती चे संस्थापक शरद विमल दिनकर शेजवळ सर यांनी प्रास्ताविकात भय भ्रष्टाचार कॉपीमुक्त परिषदेची भूमिका विशद केली.
परिषदेचे सूत्रसंचालन विनोद पानसरे यांनी केले तर तांत्रिक साहाय्य सुभाष वाघेरे,शैलेंद्र वाघ यांनी केले.ऑनलाईन स्वरूपात झालेल्या परिषदेला विद्यार्थी पालक शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
सोबत फोटो पाठवत आहे
आपला
शरद दिनकर शेजवळ संस्थापक अध्यापकभारती फोन संपर्क 98 22 64 57 06

अजून बातम्या वाचा..

शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

राज्यातील ओबीसी,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील आरक्षण वाचवणे बाबत नांदगाव सकल ओबीसी,भटक्या...

read more
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]