महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे ४४ वे वार्षिक अधिवेशन पुणे येथे नुकतेच पार पडले. यात संघटनेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी प्रवीण बागूल यांची तर सरचिटणीसपदी संजय खाडे यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी : संघटन सचिव – प्रवीण काटोले, कार्याध्यक्ष – किशोर बागूल (महावितरण), मंगेश शिंदे (महापारेषण), नंदकिशोर पांडे (महानिर्मिती), उपसरचिटणीस – प्रणेश शिरसाठ (महावितरण), सतीश जाधव (महापारेषण), धीरज विसपुते (महानिर्मिती), कोषाध्यक्ष – तुषार खैरनार, महिला प्रतिनिधी – मंजुषा दुसाने (क्षेत्रीय कार्यालय), स्मिता बडे (सांघिक कार्यालय).
नवनिर्वाचित सरचिटणीस संजय खाडे म्हणाले की, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती व सूत्रधारी कंपनी अंतर्गत वित्त व लेखा, मानव संसाधन, माहिती व तंत्रज्ञान, औद्योगिक संबंध, जनसंपर्क, विधी, सुरक्षा व अंमलबजावणी आदी विभागातील अधिकाऱ्यांचे ही संघटना प्रतिनिधित्व करते. तिन्ही वीज कंपन्यांतील अतांत्रिक अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन कार्यकारिणी अधिक जोमाने प्रयत्न करणार आहे. यात अधिकाऱ्यांचे वर्क नॉर्म्स निश्चित करणे, सर्व अतांत्रिक अधिकार्यांच्या रखडलेल्या पदोन्नती पॅनलबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) वेतननिश्चितीमधील तफावत दूर करणे, जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या अपग्रेडेशनबाबत प्रश्न निकाली काढणे, अंतर्गत भरती प्रक्रिया पुन्हा राबविण्याबाबत उपाययोजना करणे, लेखापरीक्षण पूर्वीप्रमाणेच लेखा विभागामार्फत सुरू करणे, महावितरण कंपनीस आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनास सर्वोतोपरी मदत करणे, वीज उद्योगास खाजगीकरणापासून रोखणे आदी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळामध्ये कामकाज करण्याचा मानस आहे, असे सरचिटणीस संजय खाडे यांनी सांगितले.
Breaking News
[post-marguee]

मराविमं अधिकारी संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर;अध्यक्षपदी प्रवीण बागूल, सरचिटणीसपदी संजय खाडे
अजून बातम्या वाचा..
मनमाड वर्कशॉप मधील एल.एस.सेक्सन तर्फे दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त खिरदान..
मनमाड वर्कशॉप मधील एल.एस. सेक्सन तर्फे दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ने खिरदान करण्यात आली....
मनमाड वर्कशॉप मधील फायनल सेक्सन मध्ये दसरानिमित्त औजारांची पुजा…
मनमाड:- मनमाड वर्कशॉप मधील फायनल सेक्सन मध्ये दसरानिमित्त औजारांची पुजा करण्यात आली. फायनल शेक्सन...
“शारदीय नवरात्रौत्सव”…. आज नवमी माळ
मनमाड : गेल्या आठ दिवसांपासुन सुरू असणाऱ्या नवरात्री उत्सवाची आज नवमी माळ , यंदाच्या वर्षी...
मनमाड महाविद्यालयात नेत्रतपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न…
मनमाड:- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड व रोटरी क्लब...
आ.सुहास कांदे आणि अंजुम कांदे यांनी त्या चिमुरड्यांना दिला मायेचा आधार..
नांदगाव येथे रेल्वे अपघातात मुत्यू पावलेल्या स्वाती शिंदे यांच्या कुटुंबीयांची आमदार सुहास...
वैज्ञानिक दृष्टिकोन अनुकरणानेच भारत प्रबुद्ध होईल : डॉ.संग्राम पाटील
येवला : अविद्देतून बोधी म्हणजेच अज्ञानातून प्रज्ञेकडे जाने हाच दुःख मुक्तीचा मार्ग असून...
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वैकुंठ ड्रायफ्रूट व नमकीन या नवीन दालनाचे उद्घाटन…
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर वैकुंठ ड्रायफ्रूट व नमकीन, नेहरू रोड, (जुनी देना बँक) या नवीन दालनाचा...
आज मनमाड शहरात दोन ठिकाणी लसीकरण मोहीम…
आज गुरुवार दि. १४ आक्टोबर रोजी शहरात दोन ठिकाणी लसीकरण होणार आहे १८ वर्षापुढील सर्व नागरिकांसाठी...
निमगाव मढ येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या ७४ वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर ; ७४ रक्त पिशव्यांचे संकलन
10 ऑक्टोबर रविवार रोजी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन...

