Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गारमेंट्स इंडस्ट्रीजमध्ये श्री नेमिनाथ जैन तंत्रनिकेतनातील विद्यार्थ्यांची निवड

Mar 4, 2022

चांदवड येथील श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री एच. एच. जे. बी. पॉलिटेक्निक अंतर्गत ड्रेस डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग विभागाकडून प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अंबड एमआयडीसी, नाशिक येथील चरण इंडस्ट्रीजने ड्रेस डिझायनिंग व मॅन्युफॅक्चरिंग विभागातील पास झालेले विद्यार्थी व शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये निवड केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे अंगभूत रोजगारक्षमता कौशल्ये,
सादरीकरण कौशल्ये ,वैयक्तिक मुलाखत, नवीन कल्पनात्मक विचारसरणी या बाबींचा प्रामुख्याने
संदर्भ घेवुन मूल्‍यमापन केले. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये ड्रेस डिझायनिंग व मॅन्युफॅक्चरिंग विभागाचे साक्षी कावत ,समृद्धी कावत, वैशाली बोरगुडे (बॅच 2021) ,पुजा खांगल, गायत्री देशमुख, प्रतिक्षा पगार (बॅच 2019) व

कल्याणी पाटे(बॅच 2018) यांनी यश संपादित केले. तंत्रनिकेतनाचे प्राचार्य डॉ. व्ही.ए. वानखेडे, विभागप्रमुख व उपप्राचार्य श्री. एस. एच. गौडा, तंत्रनिकेतनाचे (समन्वयक T&P) सौ. पि.
डी. सूर्यवंशी व सहकारी श्री.के. बी.गुप्ता, सौ. के. एस. सोनवणे, कु.ए . ए .गिरी, कु.पी.एस. धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेख आयोजन करण्यात आले. विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक मा. श्री अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी,

व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य मा. श्री राजेंद्रकुमारजी बंब
यांनी या आयोजनाबद्दल संबंधितांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

राज्यातील ओबीसी,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील आरक्षण वाचवणे बाबत नांदगाव सकल ओबीसी,भटक्या...

read more
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]