Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Mar 5, 2022

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर सॅबी कोरिया हे होते. याप्रसंगी माननीय पर्यवेक्षिका सिस्टर शैला, फादर लॉईड, इयत्ता दहावी अ चे वर्ग शिक्षक श्री. अनिल निकाळेसर, दहावी ब चे वर्ग शिक्षक श्री. केशव आचारेसर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. प्रियंका साळी मॅडम, दहावी अ, ब चे मॉनिटर्स आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुमरा पटेल व सायली चकोर यांनी केले. तर आभार प्रदर्शन कु. आयुष बोराडे याने केले. याप्रसंगी कु.कुणाल शिरसाठ,कु.प्रांजली आहिरे, कु.विनय आहिरे या विद्यार्थ्यांची भाषणे झालीत तर शाळेचे मा.मुख्याध्यापक फा. सॅबी कोरीया व दहावीचे वर्ग शिक्षक श्री. अनिल निकाळे सरांनी विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीबाबत मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात.शालेय गायकवृंदाने, ‘चलते चलते ये मेरे गीत याद रखना’ हे गीत सादर करून वातावरण भावविभोर केले.

अजून बातम्या वाचा..

लासलगांव स्टेशनवरील किसानसेवा रेल्वेच्या पार्सल व्हॅन (व्हीपी) ची संख्या वाढवा – ना.डॉ.भारती पवार

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे...

read more

चांदवड तंत्रनिकेतनमध्ये असिस्टंट इलेक्ट्रिशन कोर्स उत्तीर्ण लाभार्थ्याना प्रमाणपत्राचे वितरण

श्री एचएचजेबी तंत्रनिकेतमध्ये प्राधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत असिस्टंट इलेक्ट्रिशन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]