Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Mar 5, 2022

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर सॅबी कोरिया हे होते. याप्रसंगी माननीय पर्यवेक्षिका सिस्टर शैला, फादर लॉईड, इयत्ता दहावी अ चे वर्ग शिक्षक श्री. अनिल निकाळेसर, दहावी ब चे वर्ग शिक्षक श्री. केशव आचारेसर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. प्रियंका साळी मॅडम, दहावी अ, ब चे मॉनिटर्स आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुमरा पटेल व सायली चकोर यांनी केले. तर आभार प्रदर्शन कु. आयुष बोराडे याने केले. याप्रसंगी कु.कुणाल शिरसाठ,कु.प्रांजली आहिरे, कु.विनय आहिरे या विद्यार्थ्यांची भाषणे झालीत तर शाळेचे मा.मुख्याध्यापक फा. सॅबी कोरीया व दहावीचे वर्ग शिक्षक श्री. अनिल निकाळे सरांनी विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीबाबत मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात.शालेय गायकवृंदाने, ‘चलते चलते ये मेरे गीत याद रखना’ हे गीत सादर करून वातावरण भावविभोर केले.

अजून बातम्या वाचा..

बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम सुधारणा करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षस्थानी राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी...

read more

मनमाड न्यायालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

मनमाड न्यायालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतांना...

read more

१८ तास अभ्यास करून अनोख्या पद्धतीने येथील अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]