loader image
[ays_poll id=7]

डॉ. सौ वर्षा झाल्टे ‘सुकन्या पुरस्काराने ‘ सन्मानित

Mar 7, 2022

मनमाड : शहरातील सामान्य नागरिक आणि महिलांसाठी सदैव वेग-वेगळे उपक्रमाचे आयोजन करून समाजकार्य करणाऱ्या रौनक फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सौ वर्षा झाल्टे यांना महिला दिनानिमित्त महावीर इंटरनॅशनल संस्था नाशिक यांच्या वतीने ‘सुकन्या पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

मनमाड शहर आणि परिसरातील वाड्यावस्ती , तांडे येथे गरीब आणि गरजवंत लहान मुले , महिला आणि नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रौनक फौंडेशनच्या माध्यमातून नेहेमी करण्यात येत असते , शहरातील बेरोजगार आणि गरजवंत महिलांच्या रोजगारासाठी देखील डॉ.झाल्टे या प्रयत्नशील असुन त्यांनी नुकतेच रौनक फौंडेशनच्या माध्यमातुन साधना महिला गृह उद्योग चालु केला आहे. डॉ. झाल्टे या शहरातील अनेक समाजिक संस्थामध्ये देखील सक्रिय आहे. याच कार्याची दखल घेऊन नाशिक येथील नामवंत असणारी महावीर इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त नाशिक येथे आयोजित कार्यक्रमामध्ये डॉ.वर्षा झाल्टे यांना ‘सुकन्या पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त झाल्याने डॉ. वर्षा झाल्टे यांचे शहरातील सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.