loader image
[ays_poll id=7]

कला शिक्षकाचा फलक रेखाटनातून “स्त्रीशक्ती” ला सलाम !

Mar 8, 2022



दिनांक ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
आज महिला शिक्षण, वैद्यकीय, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, संशोधन ,अशा सर्व क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवीत आहेत. समाजात दृष्टीआड अशा काही कर्तुत्ववान महिला आहेत ज्या त्यांच्या कार्याने विपरीत परिस्थितीत जिद्द, हिम्मत, मेहनत व चिकाटी च्या जोरावर येणाऱ्या अडचणी सोबत दोन हात करून भल्याभल्यांना लाजवतील. अशाच या देशातील पहिल्या सुशिक्षित महिला ट्रक चालक भोपाळच्या योगिता रघुवंशी आहेत. कॉमर्स एल एल बी चे शिक्षण घेतलेली महिला पतीच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबातील दोन मुलांची जबाबदारी घेत १४ टायर ट्रक, ३० टन लोड करून देशाच्या कानाकोपऱ्यात दिवस-रात्र भ्रमण करणारी ही एक रणरागिनी.
कुटुंबात सुखदुःखाच्या रस्त्यावरून जाताना घराच्या ड्रायव्हिंग सीटवरून ते हायवेवरील ट्रकच्या ड्रायव्हिंग सीटवरील योगिता रघुवंशी यांचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. दोन मुलांना घरी ठेवून रात्रंदिवस देशभर ट्रक प्रवास म्हणजे स्टेरिंग वरील डेअरींगच ,,,,!
कदाचित महिला सशक्तिकरणा ची सुरुवात येथूनच होते. स्त्री म्हणजे आई ,बहिण ,पत्नी, मैत्रीण, जन्माची सुरुवात. तिचा आदर व सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त रंगीत खडू माध्यमात रेखाटनातून तिच्या धैर्याला व कर्तुत्वाला सलाम,,,,! व समस्त स्त्री शक्तीला मानाचा मुजरा.. !!
फलक रेखाटन- देव हिरे.
(कलाशिक्षक, ‘ शिक्षण मंडळ भगूर ”संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे  जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

  नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा....

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

❗❗🚩🚩 मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.