Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

Mar 10, 2022

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी आहे. आयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू आजच्याच दिवशी म्हणजे 10 मार्च 1897 साली झाला. प्लेग पिडितांसाठी काम करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भारतीय सामाजिक सुधारणेचे अग्रणी असलेल्या महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाज सुधारणेचं काम केलं. त्या काळात मुलीचं शिक्षण म्हणजे अशक्य अशीच गोष्ट होती. पण ज्योतिबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी त्याची सुरुवात केली. सामाजिक सुधारणा असो वा अन्यायी रुढी परंपरा असो, सावित्रीबाई आपल्या मतांवर कायम ठाम राहिल्या आणि भारतीय मुलींच्या शिक्षणाची द्वारे खुली केली. सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबांच्या मदतीने पुण्यात पहिल्या मुलीच्या शाळेला सुरुवात केली. त्याच शाळेत त्यांनी शिक्षिकेचं काम केलं. त्या अर्थी त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले यांनी समाजातील जातीयवाद आणि अन्यायी रुढी परंपरा यांच्या विरोधात आवाज उठवला. अत्याचार, बालविवाह यांच्याविरोधात भूमिका घेतली आणि समाजात जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ज्योतिबा फुले 13 वर्षाचे असताना आणि सावित्रीबाई 10 वर्षाचे असताना त्यांचे लग्न झाले. नंतर त्यांनी बालविवाहाची प्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. स्त्री शिक्षणासाठी काम करताना त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडावं लागलं आणि समाजातून बहिष्कृत व्हावं लागलं. . 1848 साली त्यांनी पुण्यात मुलींच्यासाठी पहिली शाळा स्थापन केली. त्यावेळी त्यांच्या या शाळेत केवळ नऊ मुली होत्या.

विधवा स्रियांचे मुंडण करण्याच्या प्रथेवर त्यांनी आसूड ओडला. 1873 साली ज्योतिबांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. 1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. प्लेगच्या गंभीर परिस्थितीत त्या आजारी लोकांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देत होत्या. सावित्रीबाई स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता रूग्णांची सुश्रृषा करीत राहिल्या. असं करत असताना त्या स्वत: देखील प्लेगच्या बळी पडल्या आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. आपलं आयुष्य समाजसेवेत खर्ची करणाऱ्या सावित्रीबाईंच्या आयुष्याचा शेवटही समाजाच्या भल्यासाठीच झाला. आजही त्यांचे काम भारतातील अनेकजणांना प्रेरणा देतं. 1998 साली भारत सरकारने सावित्रीबाईंच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट प्रकाशित केलं आहे.

आज शहरामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले , महात्मा फुले चौक येथे महात्मा फुले माळी समाज मित्र मंडळाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी श्री अशोक देवरे , श्री चंद्रकांत मोकळं , श्री राजु रौदळे , श्री सुनील साळवे , श्री दिनकर कांबळे , श्री संदिप साळुंके आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सरकारी रुग्णालयांमध्ये केस पेपर वरील जातीचा कॉलम हटविणार – आरोग्य विभाग आयुक्तांचे आदेश

सरकारी रुग्णालयांमध्ये केस पेपर वरील जातीचा कॉलम हटविणार – आरोग्य विभाग आयुक्तांचे आदेश

सरकारी रुग्णालयांत येणाऱ्यांना जात विचारून त्यांचा अवमान होईल, अशी घटना कुठल्याही आरोग्य संस्थेत...

read more
नाशिकचे मनीष सोनीमिडे यांचे नुकतेच निधन झाले…..त्यांच्या दिलखुलास व्यक्तीमत्त्वाबाबत सी ए प्रफुल्ल बरडीया यांनी व्यक्त केलेल्या भावना

नाशिकचे मनीष सोनीमिडे यांचे नुकतेच निधन झाले…..त्यांच्या दिलखुलास व्यक्तीमत्त्वाबाबत सी ए प्रफुल्ल बरडीया यांनी व्यक्त केलेल्या भावना

नाशिक चे मशनरी उद्योजक यश एंटर प्राइज चे संचालक दानशूर व दिलखुलास व्यक्तिमत्त्व मनिष सोनीमिडे...

read more
हिरेनगर येथील महिलांना भुताळीन समजून मारहाण झाल्याच्या प्रकरणाची चौकशी कारावी अ. नि. स मागणी

हिरेनगर येथील महिलांना भुताळीन समजून मारहाण झाल्याच्या प्रकरणाची चौकशी कारावी अ. नि. स मागणी

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथील महिलांना भुताळीन ,डाकीन म्हणून हिणावुन...

read more
गाईच्या गोठ्याच्या फाईल वर सही करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या येवल्याच्या दोन अधिकाऱ्यांवर ए सी बी ची कारवाई

गाईच्या गोठ्याच्या फाईल वर सही करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या येवल्याच्या दोन अधिकाऱ्यांवर ए सी बी ची कारवाई

येवला येथील पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गंभीर लहू सपकाळे वय ३६...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]