loader image
[ays_poll id=7]

कृषिपंप वीज देयकांच्या दुरुस्ती शिबिराला ग्राहकांचा प्रतिसाद

Mar 14, 2022


नाशिक जिल्ह्यात १ हजार ६५६ ग्राहकांचा सहभाग

थकबाकीतील ३५ लाख ४४ हजार रुपयांचा ग्राहकांनी केला भरणा

 नाशिक परिमंडळामध्ये १० व ११ मार्च रोजी नाशिक व मालेगाव मंडळातील तालुकानिहाय व उपविभागनिहाय महावितरणच्या उपविभागीय कार्यालयामध्ये कृषीपंप वीज देयकाच्या दुरुस्तीसाठी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये नाशिक मंडळातील ८४६ ग्राहकांनी सहभाग नोंदविला यामध्ये प्राप्त ४१३ तक्रारींपैकी १९२ ग्राहकांची वीजबिले जागेवरच दुरुस्त करून देऊन २३ लाख ८६ हजार रुपयांचा भरणाकेला तसेच मालेगाव मंडळातील ८१० ग्राहकांनी सहभाग नोंदवित यामध्ये प्राप्त ३७९ तक्रारींपैकी २६९ ग्राहकांची वीजबिले जागेवरच दुरुस्त करण्यात येऊन कृषी पंप वीज देयकाच्या थकबाकी मधील ११ लाख ५८ हजार रुपयांचा भरणा ग्राहकांनी केला.  अशाप्रकारे नाशिक जिल्ह्यात १६५६ ग्राहकांनी सहभाग नोंदवित त्यांच्या ४६१ तक्रारींचे निवारण करण्यात आले, यासोबतच कृषी बिलाच्या थकबाकीतील ३५ लाख ४४ हजार रुपयांचा भरणासुद्धा ग्राहकांनी शिबिरात केला.  

सदर वीज बिल दुरुस्ती शिबीर हे गुरुवार १० मार्च रोजी मालेगाव मंडळातील कळवण, मालेगाव, मनमाड व सटाणा विभागाअंतर्गत उपविभागामध्ये आयोजितकरण्यात आले होते त्यामध्ये मनमाड विभागात ४२७ ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात २८३ ग्राहकाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यातील १९९ ग्राहकाच्या तक्रारींचे निराकरण केले असून ग्राहकांनी यावेळी ३ लाख रुपयांचा भरणाही यावेळी केला. सटाणा विभागात १०० ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त १२ ग्राहकाच्या तक्रारी १२ तक्रारींचेही निराकरण झाले असून ग्राहकांनी यावेळी ७ लाख ७ हजार रुपयाचा भरणा केला. मालेगाव विभागात १७१ ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यामध्ये प्राप्त ३४ ग्राहकाच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण झाले असून ग्राहकांनी यावेळी ८५ हजार रुपयाचा भरणा केला. कळवण विभागात ११२ ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त ५० ग्राहकाच्या तक्रारीपैकी २४ तक्रारींचे निराकरण झाले असून ग्राहकांनी यावेळी ६४ हजार रुपयाचा भरणा केला. असे एकूण मालेगाव मंडळात ८१० ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त ३७९ ग्राहकाच्या तक्रारींपैकी २६९ ग्राहकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण झाले असून ग्राहकांनी यावेळी ११ लाख ५८ हजार रुपयाचा भरणा केला. 

शुक्रवार ११ मार्च रोजी नाशिक मंडळातील चांदवड, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर १ व नाशिक शहर २ विभागाअंतर्गत उपविभागामध्ये वीज बिल दुरुस्ती शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये चांदवड विभागात २१४ ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात ६९ ग्राहकाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यातील ४८ ग्राहकाच्या तक्रारींचे निराकरण केले असून ग्राहकांनी यावेळी ४ लाख ७ हजार रुपयांचा भरणा  केला. नाशिक ग्रामीण विभागात २३५ ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त १०४ ग्राहकाच्या तक्रारी २१ तक्रारींचेही निराकरण झाले असून ग्राहकांनी यावेळी ४ लाख ६१ हजार रुपयाचा भरणा केला. नाशिक शहर १ विभागात १० ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त ६ ग्राहकाच्या तक्रारींपैकी ५ तक्रारींचे  निराकरण झाले असून ग्राहकांनी यावेळी ७ लाख १४ हजार रुपयाचा भरणा केला. नाशिक शहर २ विभागात ३८७ ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त २३४ ग्राहकाच्या तक्रारींपैकी ११८ ग्राहकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण झाले असून ग्राहकांनी यावेळी ८ लाख ४ हजार रुपयाचा भरणा केला. असे एकूण नाशिक मंडळात ८४६ ग्राहकांनी सहभाग नोंदविला होता त्यात प्राप्त ४१३ ग्राहकाच्या तक्रारींपैकी १९२ ग्राहकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण झाले असून ग्राहकांनी यावेळी २३ लाख ८६ हजार रुपयाचा भरणा केला. 

शिबीर यशस्वी करण्यासाठी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर  यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर तसेच मालेगाव मंडळाचे अधिक्षक अभियंता रमेश सानप यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते, अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांनी परिश्रम घेतले. कृषी ग्राहकांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व समावेशक कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२० जाहीर केले आहे. यानुसार थकबाकीदार कृषिपंप धारकांना वीजदेयकाची थकबाकी भरतांना निर्लेखनाद्वारे तथा व्याज व विलंब आकारामध्ये सूट दिली आहे. मात्र या योजनेत बिले भरतांना वीज बिले दुरुस्त करून देण्याची मागणी महावितरणला प्राप्त झाली होती त्यानुसार शिबीर आयोजित करण्यात आले होते.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.