Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू

Mar 15, 2022

मौजे कातरवाडी वडगाव पंगु वनविभाग हद्दीत आज सायंकाळी ५:३० च्या सुमारास परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू झाला….. कातरवाडी येथील शेतकरी संदीप झाडे यांच्या शेतालगत ही घटना घडली… शेतात काम करत असताना त्यांच्या ही घटना लक्षात आली… त्यांनी तात्काळ भागवत झाल्टे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली…. भागवत झाल्टे यांनी वनमजूर भाऊसाहेब झाल्टे,यांच्यासह ग्रामस्थ संदीप झाल्टे,सुभाष संसारे,यांना सोबत घेत घटना स्थळी धाव घेतली…परंतु भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू झाला होता. निसर्गप्रेमी नागरिकांकडून सदर घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.काही महिन्यांपूर्वी सुध्दा या परिसरातील बेवारस कुत्र्यांच्या हल्ल्यात परिसरातील बालकांना गंभीर दुखापत झाली होती. भटक्या बेवारस कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यात पत्रकारांची भक्कम एकजूट विधायक उपक्रम राबविणार; पत्रकार दिनी निर्धार

नांदगाव तालुक्यात पत्रकार संघाची भक्कम एकजुट तयार करण्याचा निर्धार व्यक्त करत पत्रकारांपुढील बदलती...

read more
शासकीय नियमावलीचे पालन करून यंदाच्या वर्षीच्या विवेकानंद व्याख्यान मालेचे आयोजन…. अध्यक्ष-योगेश म्हस्के

शासकीय नियमावलीचे पालन करून यंदाच्या वर्षीच्या विवेकानंद व्याख्यान मालेचे आयोजन…. अध्यक्ष-योगेश म्हस्के

संस्कृती संवर्धन समिती आयोजित रौप्य महोत्सवी वर्ष यशस्वीपणे पूर्ण करणारी महाराष्ट्रातील एक प्रमुख...

read more

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे असोसिएशन च्या नवीन वर्षाच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]