loader image
[ays_poll id=7]

नवाब मलिकांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Mar 16, 2022

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधी आणि मनी लॉंड्रिंगप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. केंद्रीय तपासयंत्रणांची कारवाई कायद्यानुसारच असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने ईडी कारवाईविरोधातील मलिकांची याचिका फेटाळली आहे. तसेच अटक बेकायदेशीर असल्याचा नवाब मलिकांचा दावा चुकीचा असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले आहे. नवाब मलिकांपुढे रितसर जामीन करण्याचा एकमेव मार्ग उपलब्ध आहे, असे उच्च न्यायालयाने सांगितले आहे.नवाब मलिकांच्या याचिकेत म्हटले होते की, ‘ईडीने राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली आहे. भाजप नेते आणि केंद्र सरकारवर आरोप केल्यामुळे त्याचे प्रत्युत्तर म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत ईडीने ही कारवाई केली आहे. जमीन व्यवहारासंबंधीतील हे प्रकरण जवळपास २० ते २२ वर्षांपूर्वीचे आहे. ज्या कायद्या अंतर्गत नवाब मलिकांना अटक करण्यात आली आहे, त्यावेळी तो कायदाच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे पूर्वलक्षी प्रभावाने ही कारवाई केली आहे.’मलिकांचे वकील म्हणाले की, ‘नवाब मलिक एक मंत्री आहेत. तसेच कुर्ला विधानसभाच्या जागेचे ते प्रतिनिधित्व करतात, ते एक आमदार आहेत. त्यांना तातडीने अटक करण्याची गरज नव्हती. जर चौकशी करायची असती, तर त्यांनी समन्स पाठवून चौकशीला बोलवून तपास करू शकले असते.’ याप्रकरणात फौजदारीचा प्रकारही नाही. त्यामुळे कोठडीला विरोध केला होता. परंतु ईडीचे एएसजी अनिल सिंग यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले. भले तो व्यवहार २० वर्ष जुना असला तरी, तो थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशीसंबंधित आहे. त्यामुळे देशविघातक कारवायांना कुठेतरी समर्थन दिले जात आहे. तसेच दहशतवाद्यांना फंडिंग केले गेले आहेत, असे गंभीर आरोप ईडीने आरोपपत्रात लावले आहेत.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.