Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आझाद हॉल जवळील गटारीवर त्वरित ढापा बसवण्याची नागरिकांची मागणी

Mar 20, 2022

मनमाड नगरपालिकेच्या मागील आझाद रोडवरील चांदीच्या गणपती समोर भूमिगत गटारीच्या चेंबर वरील ढापा फुटल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
गेल्या 15 ते16 वर्षांपूर्वी याच भूमिगत गटारीच्या फुटलेल्या चेंबरमुळे एका सायकलस्वाला आपला जीव गमवावा लागला असल्याची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली असून सदर चेंबर दुरूस्त करून चेंबरवरील ढापा लवकरात लवकर लावावा, अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांद्वारे जोर धरू लागली आहे.
मनमाड शहराच्या मध्यवर्ती असलेल्या आझाद रोडवर नेहमीच नागरिकांची गर्दीचे स्वरूप पाहावयास मिळते. या रस्त्यामध्ये भूमिगत गटार असून या गटारीच्या चेंबरवरील ढापा गेल्या 15 ते 16 वर्षांपूर्वी अशाच प्रकारे फुटला होता. एक सायकलस्वार याच भूमिगत गटारीच्या चेंबरमध्ये पडून त्याच्या डोक्याला, मानेला गंभीर मार लागल्याने कोमात जाऊन काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या सायकलस्वाराच्या अपघाताची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. यामुळे सदर चेंबरवरील फुटलेल्या ढाप्याची नगरपालिका प्रशासनाने त्वरित दुरूस्ती करावी व रस्त्यामधील अडथळा दूर करावा, अन्यथा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नेहमीच गर्दीचे ठिकाण असलेल्या या रस्त्यावरून लहान मुले, वयोवृध्द नागरिक ये-जा करीत असतात. या फुटलेल्या चेंबरवरील ढाप्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावरून मोटरसायकल, रिक्षा तीन चाकी व चारचाकी वाहनांचीही वर्दळ लक्षात घेता न.पा.प्रशासनाने या चेंबरील ढापा दुरूस्ती करून नागरिकांच्या जिवाला होणारा धोका टाळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अजून बातम्या वाचा..

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]