मध्य रेल्वेच्या केंद्रीय कारखाना येथे सालाबादाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कर्मचारी श्री भगवान पगारे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कुमारी हर्षदा कांबळे या विद्यार्थीनी ने आपले शिवविचार मांडले. सदर कार्यक्रम प्रसंगी कारखाना परिवारातील सर्व पुरुष व महिला कर्मचारी, अधिकारी वर्ग तसेच सर्व युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.
मनमाड महाविद्यालयातर्फे वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक कचरा स्वच्छता मोहीम राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त राष्ट्रीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजना यांचा अभिनव उपक्रम.
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय...











