Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

झी 24 तास वृत्त वाहिनीचा मानाचा ” अनन्य सन्मान ” पुरस्कार श्री.प्रवीण व्यवहारे सर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान

Mar 26, 2022

मनमाड – कबड्डीच्या पंढरी असलेल्या मनमाड शहरात वेटलिफ्टिंगसारख्या खेळाचे पाळे मुळे रुजवित राज्य, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडविण्याचे अनन्य कामाची दखल घेत. झी 24 तास या महाराष्ट्रातील आघाडीच्या लोकप्रिय वृत्तवाहिनीतर्फे छत्रे विद्यालयाचे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रविण व्यवहारे यांचा यंदाचा मानाचा ‘अनन्य सन्मान ‘पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
मुंबई येथे संपन्न झालेल्या शानदार सोहळ्यात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ,राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ,मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ,आ.आशिष शेलार ,आ.भाई जगताप ,विश्वास नांगरे पाटील ,झी 24 तासचे संपादक निलेश खरे यांच्या सह माजी आंतरराष्ट्रीय धावपटू व ओलीम्पियन ललिता बाबर यांच्या हस्ते प्रविण व्यवहारे यांना ‘अनन्य सन्मान ‘ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. व्यवहारे यांना अनन्य सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल जयभवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड, प्रा दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर ,सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी,प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर.एन.थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका एस. एस. पोतदार यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच मनमाडच्या क्रीडा जगतातून व्यवहारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

जागतिक कीर्तीचे तबलावादक ,तालतज्ञ, पदमविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]