Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

AAAA+Ls चे समन्वयाने सॕम-मॕम बालकांच्या वजनवाढीसाठी राष्ट्रीय पोषण पंधरवडा २०२२ मध्ये करणार विशेष प्रयत्न- मयुरी महिरे

Mar 28, 2022

मुख्यसेविका एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी (नाशिक) २ च्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय पोषण पंधरवडा २१ मार्च ते ०४ एप्रिल २०२२ या कालावधीत राबविला जात आहे..याकालावधीत सॕम-मॕम बालकांच्या वजनवाढीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत..यात अमायलेज युक्त पिठाची पाककृती पालकांना समजावून सांगितली जाणार आहे..पालकांना त्याचे प्रात्यक्षिकही करुन दाखवीले जाणार आहे..या पिठाचा बालकांचे रोजच्या प्रत्येक आहारात एक चमचा समावेश केल्यास बालकांच्या वजनात वाढ होणार आहे..ही पाककृती तयार करतांना अख्खे गहू, अख्खे मुग, नाचणी (रागी) तांदूळ, सोयाबीन (८ महिने पूर्ण झालेल्या बालकांसाठी) भोपळ्याच्या बिया,काळे तिळ, यांचा वापर केला जाणार आहे..सॕम-मॕम बालकांच्या पालकांना प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे व अंगणवाडी केंद्रात मार्गदर्शन केले जाणार आहे..सॕम-मॕम बालकांच्या वजनात वाढ व्हावी यासाठी मुख्यसेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनिस, आशा सेविका या प्रयत्न करत आहेत..

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्राचा ‘बेस्ट स्टेट युटीलिटी’ पुरस्काराने सन्मान, ‘गुणवत्ता सुधार’ वर्गवारीत महावितरणचा तृतीय क्रमांक

नवनवीन संकल्पनांचा प्रभावी वापर, महावितरणच्या ग्राहकांना उच्चदर्जाची सेवा मिळावी व त्याकरिता...

read more

आमदार कांदे यांच्या हस्ते विवेकानंद व्याख्यानमालेचे उद्घाटन ! सकारात्मक विचार हाच जीवनाचा खरा “मंत्र” – घळसासी

मनमाड : गेल्या 25 वर्षांपासून मनमाड शहरातील नागरिक आणि रसिक श्रोत्यांना ज्ञानाची शिदोरी देणाऱ्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]