Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात ई – शैक्षणिक साधनांचे महत्त्व आणि उपयुक्तता – कार्यशाळा याबाबत मार्गदर्शन

Mar 28, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे दिनांक 28 मार्च 2022 रोजी दृकश्राव्य माध्यमातून वाणिज्य विभागातर्फे ” ई – शैक्षणिक साधनांचे महत्त्व आणि उपयुक्तता बाबत मार्गदर्शन”चे आयोजन करण्यात आले. असून याप्रसंगी मुख्य अतिथी प्रा. डॉ. राहुल लोखंडे,महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड, येथे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ई -शैक्षणिक साधनांचे महत्त्व आणि उपयुक्तता या बाबत महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले. .त्यासाठी वेबसाईट चे संपूर्ण ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. ई- साक्षरता ही काळाची गरज आहे.आणि त्यासाठी ही शैक्षणिक साधने कोणती आहेत त्याबद्दल प्रा.डॉ.राहुल लोखंडे यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. व्ही.पाटील यांनी भुषविले.याप्रसंगी वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस डी थोरे यांनी आपले प्रास्ताविक व अतिथी परिचय व्यक्त केले.असून त्यांनी ” ई- शैक्षणिक साधन प्रत्येक विद्यार्थ्याने माहिती करून घ्यावी असे, व्यक्तव्य केले तसेच ग्रंथालय हे ज्ञानप्राप्तीचा झरा आहे. अनादी काळापासून ज्ञानाचा स्रोत ग्रंथालयात समाविष्ट झाला आहे.असे मत वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस डी थोरे यांनी व्यक्त केले.
तर महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.डॉ. सतीश तांबे यांनी आपले मत व्यक्त केले.सुत्रसंचालान प्रा.एस ए मुसळे यांनी केले,आभार प्रदर्शन डॉ.व्ही.एस नजरधने यांनी मानले .कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आंबेकर सर,डॉ.थोरात सर,
डॉ.भोसले सर,डॉ.राठोड सर, डॉ.इंगळे सर,कुलसचिव समाधान केदारे सर, डॉ.मिलिंद अहिरे सर डॉ. शेंडगे सर, डॉ.कराड सर प्रा. सोनवणे सर प्राध्यापिका ए.एस छाजेड यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला

अजून बातम्या वाचा..

अडीच महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या साकोरा वासियांना प्रतीक्षा उपाययोजनांची

अडीच महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या साकोरा वासियांना प्रतीक्षा उपाययोजनांची

नांदगाव : मारुती जगधने अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर साकोरा गावाला शास्वत पाणी पुरवठा होणार...

read more
बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये ४५ किलो वजनी गटात ६०...

read more
सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील सराफ सुवर्णकार बांधव जे सराफी व्यवसाय करतात त्यांच्या सुरक्षेबाबतच्या समस्यांचे निराकरण...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]