loader image

अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एप्रिल महिन्यातही राहणार शाळा पूर्णवेळ सुरू

Mar 29, 2022


कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. उन्हाळी सुट्टी रद्द करत एप्रिल महिन्यातही शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून मागणी करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर हा शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

गेली दोन वर्ष कोरोनामुळे शाळांमध्ये विस्कळीतपणा आला होता, तो दूर करण्याची मागणी शिक्षक, पालक यांच्याकडून केली जात होती. त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी एप्रिलमध्ये पूर्णवेळ शाळा सुरु ठेवण्याची मुभा शासनाने दिली आहे. १०० टक्के क्षमतेने शाळा सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एवढंच नव्हे तर रविवारी देखील शाळा सुरु ठेवण्याची मुभा आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला होता. परंतु, ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांकडून शाळा पुन्हा सुरु करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान, आता शिक्षण विभागाने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा मात्र विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त अभ्यासच करावा लागणार आहे.


अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.