Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गुरुवारी नांदगावला गांधी हॉस्पिटलच्या वतीने मोफत हृदयरोग, मधुमेह निदान शिबिर

Mar 29, 2022

गुरुवार दिनांक ३१/३/२०२२ रोजी नांदगाव शहरातील जैन दवाखाना, महावीर मेडिकल शेजारी येथे सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत हृदयरोग,मधुमेह निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे मनमाडच्या सुप्रसिद्ध डॉक्टर सोनल गांधी यांनी कळविले असून ह्या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी करून आवश्यक असल्यास रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व शिबिरात येताना जुने रिपोर्ट्स व फाईल अवश्य घेऊन यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या शिबिरात साखर तपासणी, ई.सी. जी हृदयरोग निदान व उपचार, थायरॉईड ग्रंथीचे विकार,दम्याचा विकार,झटक्यात फिट येणे,न्युमोनिया, संधिवात, रक्तदाब,आहार विषयक सल्ला,मधुमेह निदान व उपचार,यकृत रोग,मेंदूचा झटका, कोरोना / क्षयरोग, पोटाचा विकार, लठ्ठपणावर उपचार, अपस्मार आदी आजारांवर योग्य ती तपासणी करून उपचार केले जाणार आहेत. जास्तीतजास्त गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गांधी हॉस्पिटल मनमाडच्या वतीने करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]