Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

निवडणुकांचे भवितव्य आता सुप्रीम कोर्टाच्या हातात !

Mar 30, 2022

इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळात विशेष कायदा केल्याने निवडणुकीची प्रक्रियाच थांबली आहे. त्यामुळे शासन निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात सात याचिका दाखल असून त्या याचिकांवर पुढील आठवड्यापर्यंत सुनावणी होईल. न्यायालयाने राज्य शासनाचा आदेश रद्द केल्यास तत्काळ निवडणूका होतील अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला टप्पा पार करून कायद्यामुळे घरी बसलेल्या अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

राज्यातील २२ महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणावरून राज्य सरकारला फटकारले. ओबीसींचे आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय पेच निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने विधिमंडळात कायदा करून निवडणूक आयोगाचे सर्वाधिकार स्वतःकडे घेतले. त्या दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू करताना प्रभागरचनेचा प्रारूप आराखडादेखील जाहीर केला.

विधिमंडळातील कायद्यामुळे दिवाळीनंतर निवडणुका होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, राज्य विधी मंडळाच्या निर्णयाविरोधात सात याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. यात घटना महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करण्यात आले त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]