loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ३१ मार्च २०२२ !

Mar 31, 2022


मेष :- मानसिक व्यग्रता जाणवेल. अधिकारी व्यक्तींची मदत होईल.

वृषभ :- उत्तम व्यावसायिक लाभ होईल. आर्थिक अपेक्षा पूर्ण होतील.

मिथुन :- कलेतून नावलौकिक वाढेल. कामातून अपेक्षित लाभ मिळवता येईल.

कर्क :- काही अपेक्षा पूर्ण होण्यास वेळ द्यावा लागेल. अपयशाने खचून जाऊ नये.

सिंह :- जोडीदाराची व्यवहार कुशलता दिसून येईल. बौद्धिक चुणूक दाखवता येईल.

कन्या :- घरात शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. इतरांच्या विश्वासास खरे उतरावे.

तूळ :- तुमची इच्छाशक्ति वाढीस लागेल. साहसाने कामे हाती घ्याल.

वृश्चिक :- सांपत्तिक स्थिती सुधारेल. खर्च वाढू शकतो. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.

धनू :- प्रचंड आशावादी दृष्टिकोन ठेवाल. शांततेचे धोरण स्वीकारावे लागेल.

मकर :- सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. पारमार्थिक उन्नती साधता येईल.

कुंभ :- मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. आर्थिक लाभाकडे बारीक लक्ष ठेवावे.

मीन :- आवडत्या गोष्टी कराल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.


अजून बातम्या वाचा..

.