loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रीय युथ वेटलिफ्टींग स्पर्धा :आकांक्षा व्यवहारे ठरली नाशिक जिल्ह्यातील पहिली सर्वोत्कृष्ट खेळाडू

Apr 1, 2022

भुवनेश्वर ओडिसा येथे 19 ते 31 मार्च दरम्यान संपन्न झालेल्या राष्ट्रीय युथ,ज्युनिअर,सिनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत नवीन सात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणारी 40 किलो वजनी गटातील सलग दोन राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे हिला युथ मुलींच्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान प्राप्त झाला आहे. युथ मुलींच्या स्पर्धेत विविध प्रकारच्या 10 वजनी गटात भारतातील 160 सर्वोत्कृष्ट खेळाडूंनी सहभागी होत चुरस निर्माण केली.आकांक्षा व्यवहारे हिने 40 किलो वजनी गटात स्नॅच व क्लिन जर्क या दोन्ही प्रकारात आपल्या प्रत्येक प्रयत्नात नवनवीन विक्रम स्थापित करीत स्पर्धेतील युथ गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकावला. राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवणारी आकांक्षा ही नाशिक जिल्ह्यातील पहिलीच खेळाडू ठरली आहे.
यशस्वी खेळाडूस छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे,एन आय एस प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जयभवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड, प्रा दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर ,सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी,प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर.एन.थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका एस. एस. पोतदार यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
.