Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गुढीपाडवा उत्सव साजरा.. शहरात घोषासह संचलन संपन्न

Apr 2, 2022

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखसहा उत्सवापैकी एक असणारा गुढीपाडवा उत्सव शहरामध्ये साजरा करण्यात आला.

आय. यु. डी. पी. येथील श्री सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते , या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणुन संघाच्या प्रांत प्रचार मंडळाचे सदस्य श्री रमाकांत मंत्री हे उपस्थित होते , यांनी संघाच्या स्थापनेचे उद्दिष्ट सांगुन , या मागील इतिहास स्पष्ट केला. संघ हा कोणत्याही व्यक्तीला आपला गुरू मानत नसुन भगव्या ध्वजाला आपला गुरू मानत असतो.1925 साली स्थापन झालेला संघ हा लवकरच आपली शताब्दी साजरी करणार असुन , त्यानुसार समाजामध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे , संघ आणि समाज यांच्यामध्ये अंतर राहु नये यासाठी जास्तीत-जास्त संघ शाखेची गरज असुन शाखेच्या माध्यमातून समाजाने संघाचे कार्य समजुन घ्यावे असे आव्हान श्री रमाकांत मंत्री यांनी केले. श्री सप्तशृंगी देवी मंदिर येथुन संचालनाला सुरवात होऊन गुरुद्वारा , महात्मा फुले चौक , छत्रपती शिवाजी महाराज चौक , रेल्वे स्टेशन , डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा , एकात्मता चौक , महात्मा गांधी पुतळा , नेहेरू भवन मार्गे पुन्हा देवी मंदिर येथे संचालनाचा समारोप करण्यात आला.

यावेळी शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व पदाधिकारी , स्वयंसेवक , भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि शहरातील नागरिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नवक्रांतीची ज्योत तेवत ठेवा ,क्रांती दिनी निर्धार नवक्रांती युवक सघांचा ५ वा वर्धापन दिन उत्सवात साजरा

नवक्रांतीची ज्योत तेवत ठेवा ,क्रांती दिनी निर्धार नवक्रांती युवक सघांचा ५ वा वर्धापन दिन उत्सवात साजरा

नांदगाव प्रतिनिधी देशावर,राज्यावर बोलण्यापेक्षा गावावर बोला आणि क्रांतीदिन साजरा करतांना ज्या...

read more
बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

बघा व्हिडिओ – रायपूर गावातील शिव रस्ता केला ग्रामस्थांनी बंद – अतिक्रमण हटवून मोजणी करण्याची गावकऱ्यांची मागणी

चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शीव रस्ता शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने बालवाडी तसेच चिमुकल्यांना...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]