Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पाईपलाईन दुरुस्त झाली ; आता होणार का पाणीपुरवठा सुरळीत?

Apr 3, 2022

गेल्या काही दिवसांपूर्वी मनमाड – लासलगाव लोहमार्गावर मनमाड नजिक रापली गावाजवळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाटोदा ते वागदर्डी मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराला मिळणारे पाण्याचे आवर्तन घेणे थांबले होते.मात्र नगर परीषद आणि रेल्वे प्रशासनाने तातडीने काम हाती घेत काम पूर्ण केले असून या मुख्य जलवाहिनीद्वारे धरणात पाणी घेतले जात आहे. जलवाहिनी दुरुस्त झाल्यामुळे पाणीपुरवठा करण्यात होणारी दिरंगाई आता टळणार आहे.
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात पालखेड धरणाचे पाणी घेतले जाते.तत्पूर्वी पालखेड धरणाचे शहरासाठी आरक्षित असलेले पाण्याचे आवर्तन पाटाद्वारे पाटोदा येथील साठवण तलावात घेतले जाते.तर तेथून हे पाणी मुख्य जलवाहिनीद्वारे धरणात घेतले जाते.मात्र गेल्या काहि दिवसांपूर्वी रेल्वे लाईन खालून गेलेली ही जलवाहिनी फुटली होती. मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याचे आवर्तन घेणे बंद झाले होते.परिणामी शहराला केला जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे दिवस वाढले होते.
शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक आणि मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल यांनी तातडीने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्याशी संपर्क करत रेल्वे प्रशासनाला मदत करण्यासाठी मध्यस्थी करण्याचे सांगितले.त्यामुळे रेल्वेने तातडीने मदत करत पालिकेसोबत फुटलेल्या जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले होते.या मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असल्याने मनमाड नगर परिषद प्रशासनातर्फे पाटोदा येथून जलवाहिनीद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. आज हे पाणी वागदर्डी धरणात पोहचले आहे. धरणात पाणी घेण्याचे काम सुरू झाल्यामुळे शहराला केला जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे वाढलेले दिवस आता कमी केले जाण्याची शक्यता आहे.

अजून बातम्या वाचा..

शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

राज्यातील ओबीसी,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील आरक्षण वाचवणे बाबत नांदगाव सकल ओबीसी,भटक्या...

read more
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]