Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जातेगाव पिनाकेश्वर महादेव मंदिर : आमदार कांदे यांच्या प्रयत्नातून ४७५ लक्ष विकास निधी मंजूर

Apr 4, 2022

नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील श्रीक्षेत्र पिनाकेश्वर महादेव मंदिर परिसरात येथील विकास कामांसाठी ४७५.०० लक्ष रुपये साठी मंजुरी मिळाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सदर निधी उपलब्ध होणार आहे.
श्रीक्षेत्र पिनाकेश्वर महादेव मंदिर हे अतिप्राचीन पुरातन मंदिर असून नाशिक औरंगाबाद तसेच नगर जिल्ह्यातील भक्त या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.

श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे या ठिकाणी वास्तव्य राहिले असून त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे.
नांदगाव चाळीसगाव कन्नड वैजापूर अशा विविध ठिकाणाहून मोठ्या संख्येने जय बाबाजी भक्त परिवार तसेच महादेव भक्त या ठिकाणी येत असतात.
जातेगाव पासून एक-दीड किलोमीटर उत्तरेकडे महादेव मंदिर डोंगरा ची सुरुवात होते तेथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी कोणताही रस्ता नव्हता असंख्य भाविकांची ये-जा असल्याकारणाने त्या ठिकाणी पायवाट निर्माण झाली होती. सदर डोंगर हा वनविभागाच्या हद्दीत असल्याकारणाने अनेक अडचणीमुळे आज पर्यंत येथील विकास प्रलंबित होता.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी यासंदर्भात जातीने लक्ष घालून सर्व सोपस्कार पार पाडत श्रीक्षेत्र पिनाकेश्वर महादेव मंदिरासाठी जवळपास पाच कोटी रुपये मंजूर करून घेतले आहे.
या निधीअंतर्गत श्रीक्षेत्र पिनाकेश्वर महादेव मंदिर पर्यंत सिमेंट काँक्रेट रस्ता बनविण्यात येणार आहे, तसेच मंदिर परिसरात वाहनतळ व पाणीपुरवठा व्यवस्था इत्यादी विकास कामे केली जाणार आहेत.
श्रावण महिन्यातील पाचही सोमवार,महाशिवरात्री,जय बाबाजी बक्त परिवार अनुष्ठान असे धार्मिक विधी,यात्रा साठी महादेव मंदिर डोंगरावर हजारोंच्या संख्येने भाविक नेहमी येत असतात.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नांद्वारे होणाऱ्या विकासकामांच्या मुळे भाविकांना चांगला रस्ता व पाण्याची व्यवस्था वाहनतळ या सुविधा उपलब्ध होणार असल्याकारणाने भाविकांचा त्रास कमी होणार आहे.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून श्रीक्षेत्र पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या होणार असलेल्या विकास कामामुळे परिसरातील तसेच सर्व भक्त परिवारात आनंदाचे वातावरण आहे.

अजून बातम्या वाचा..

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]