Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात भाजपचा ४२ वा स्थापना दिवस साजरा

Apr 7, 2022

मनमाड शहर भाजपचे वतीने भाजपा चा 42 वा स्थापना (वर्धापन) दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी हे कार्यक्रम चे अध्यक्ष स्थानीं होते तर भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे, भाजप माथाडी कामगार सेल जिल्हा अध्यक्ष नारायण पवार हे प्रमुख अतिथी म्हणून मंचा वर उपस्थित होते सर्वप्रथम भाजपा मनमाड शहर सरचिटणीस एकनाथ बोडखे यांचे हस्ते भारतमाता पूजन करण्यात आले तर भाजप दिव्यांग आघाडी चे मनमाड शहर अध्यक्ष दीपक पगारे व भाजपा युवा कार्यकर्ते केतन देवरे यांचे हस्ते भाजपा चे प्रेरणा स्थान स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी व स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रम चा शुभारंभ झाला यावेळी उपस्थित सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाजपा च्या एकात्मवाद व अंत्योदय या मूळ तत्वज्ञानाची सामूहिक शपथ घेऊन कार्य करण्याचा संकल्प केला जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी भारतीय जनसंघ ते भाजपा या ऐतिहासिक वाटचाली ची माहिती दिली भाजप स्थापना दिना निमित्ताने भाजपचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले निवासस्थानी भाजपचे ध्वजारोहण केले या वेळी दिली कार्यक्रम चे प्रास्तावित व सूत्र संचालन भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा चे शहराध्यक्ष जलील अन्सारी यांनी केले यावेळी भारतीय जनता पार्टी चा विजय असो ,भारतमाता की जय, वंदेमातरम अश्या घोषणा नि परीसर दुमदुमून गेला या वर्धापनदिन कार्यक्रमास भाजपा जेष्ठ नेते नीलकंठ त्रिभुवन भाजपा कोषाध्यक्ष आनंद काकडे ,भाजपा भटके विमुक्त आघाडी चे जिल्हा सरचिटणीस अकबर शहा,भाजपा ओबीसी आघाडी चे जिल्हा चिटणीस गौरव ढोले, भाजप चिटणीस मकरंद कुलकर्णी, भाजपा ओबीसी आघाडी चे शहर अध्यक्ष गोविंद सानप भाजपा सहकार आघाडी शहराध्यक्ष किरण उगलमुगले,भाजपा चिटणीस सुमेर मिसर,भाजपा अनुसूचित मोर्चा शहर अध्यक्ष आशिष चावरीया ,अनंता भामरे,प्रतीक परदेशी, दर्शन भोई ,रमेश मोरे आदी प्रमुख भाजपा पदाधिकाऱ्यांन सह शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुख भाजपा कार्यकर्ते व हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रम चे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी ,आनंद काकडे ,जलोल अन्सारी यांनी केले

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ  – काँक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

बघा व्हिडिओ  – काँक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

मनमाड - दीड दोन वर्षांपूर्वी शहरातील मुख्य बाजारपेठेतील एकात्मता चौकात काँक्रीटीकरण रस्ते...

read more
चांदवडी पेढ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पोर्ट्रेट रांगोळी साकारून भीम जयंती निमित्त कलाशिक्षक देव हिरे यांचे अनोखे अभिवादन!

चांदवडी पेढ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पोर्ट्रेट रांगोळी साकारून भीम जयंती निमित्त कलाशिक्षक देव हिरे यांचे अनोखे अभिवादन!

      दि.१४ एप्रिल २०२४ रोजी भारतरत्न ,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात सर्वत्र...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा , अंशुमान सरोदे व रोहित पवार नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात तर दक्ष पाटिल चिराग निफाडकर राखीव खेळाडू

भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा , अंशुमान सरोदे व रोहित पवार नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात तर दक्ष पाटिल चिराग निफाडकर राखीव खेळाडू

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
राजे मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास प्रेरणादायी – डॉ.भारती पवार

राजे मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास प्रेरणादायी – डॉ.भारती पवार

चांदवड - हिंदुस्थानचे युगपुरुष श्रीमंत सुभेदार 'मल्हारराव होळकर' जन्मोत्सव सोहळा श्रीमंत महाराजा...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी.  मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य,महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षिका कर्मचारी  उपस्थित होते.उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यांची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]