तोट्यात चालत असल्याने लॉकडाऊन नंतर बंद करण्यात आलेली मनमाड -कुर्ला गोदावरी एक्सप्रेस पुढील तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वांवर सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या काळात या गाडीतील प्रवाशांच्या तिकिटांचे उत्पन्न लक्षात घेऊन ती पुढे सुरू ठेवायची किंवा नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.गोदावरी एक्सप्रेस पुन्हा चालू करावी, यासाठी उत्तर महाराष्ट्रांतील प्रवासी संघटना तसेच चाकरमाने, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी आदींनी ना.डॉ.भारती पवार यांना साकडे घातले होते व ही गाडी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन गोदावरी एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार रेल्वेमंत्री वैष्णव यांनी तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वांवर गोदावरी एक्सप्रेस सुरू करण्यात येईल याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल व त्यात जर या गाडीचा महसूल वाढला तर गोदावरी पूर्ववत केली जाईल असे आश्वासन रेल्वेमंत्री वैष्णव यांनी ना.डॉ.भारती पवार यांना दिले आहे. त्यामुळे लवकरच उत्तर महाराष्ट्रांतील प्रतिष्ठेची समजली जाणारी व नाशिक जिल्ह्याची नाळ मुंबईशी जोडणारी गोदावरी एक्सप्रेस सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान गोदावरी एक्सप्रेसचे सध्याचे स्वरूप व गरज लक्षात घेता तसेच या गाडीतून प्रवास करणारे चाकरमाने, विद्यार्थी, गोरगरीब शेतकरी यांची मोठ्या प्रमाणावर संख्या व सोय लक्षात घेऊन व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता सामाजिक बांधीलकीचा उद्देश समोर ठेवीत ही गाडी पूर्ववत सुरू करावी अशा आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
अनकवाडे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार…
मनमाड -येवला महामार्गावर अनकवाडे गावाजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज शनिवारी...











