Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बोलठाण उपबाजार समितीसमोर प्रहार संघटनेचे आंदोलन

Apr 9, 2022

नांदगांव तालुक्यातील,घाट,माथ्यावरील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, संतप्त होऊन, प्रशासना,विरोधात,कांदा पिकांला हजार रुपये प्रती क्विंटल दर,मिऴावा, नुकसानिला केंद्र व राज्यशासन जबाबदार असून त्यांच्या धोरणाच्या निषेधार्थ बोलठाण उपबाजार समिती समोर प्रहार शेतकरी संघटनेकडून तिव्र रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
देशभरात कांदा पिकांच्या कोसळलेल्या दरांनी कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे.कांद्याला अधिक भाव मिळाला पाहिजे व मार्च एप्रिल पर्यंत विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल एक हजार रुपये दराने अनुदान मिळाले पाहिजे. या मागणीकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथे प्रहार शेतकरी संघटनेकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आले.प्रहार शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार बोलठाण येथे अनेक कांदा उत्पादक शेतकरीही या रास्तारोको आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलकांनी कांद्याच्या ठिगात बसून तसेच कांद्याच्या माळा घालून अनोखे रास्तारोको आंदोलन केले.प्रहार शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष कैलास पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रताप सूर्यवंशी यांनी उपस्थितांना संबोधित करताना केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांचा निषेध केला.यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालूका उपाध्यक्ष चंद्रभान झोडगे,जनार्दन भागवत,निवृत्ती सोनवणे,रविकांत भागवत,राहूल पवार, यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]