भगवान महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त आनंद सेवा केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे . शिबीर दिनांक 14 एप्रिल 2022 गुरुवार रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत महावीर भवन ,मारुती रोड, मनमाड येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे हे यशस्वी 14 वे वर्ष आहे. आनंद सेवा केंद्र गेल्या पंधरा वर्षापासून मनमाड व परिसरामध्ये रुग्ण उपयोगी साहित्याची सेवा विनामूल्य देत आहे. तरी रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने शिबिराला येऊन रक्तदान करावे असे आवाहन आनंद सेवा केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
मनमाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नगराध्यक्ष योगेश पाटील यांचा सत्कार
नुकत्याच पार पडलेल्या मनमाड नगरपरिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी योगेश पाटील यांची निवड...











