Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

संजय बियाणी यांच्या हत्येचा निषेध

Apr 10, 2022

नांदेड येथील माहेश्वरी समाजाचे बांधकाम व्यावसायीक संजय बिहाणी यांची अज्ञात हल्लेखोरांनी निघृण हत्या केली .या घटनेचा नांदगाव शहर माहेश्र्वरी समाजाकडून माहेश्र्वरी प्रगती मंडळाचे रामनिवास करवा ‘ अमोल नावदंर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करून तहसिलदार नांदगाव यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत वृत असे की नांदेड येथील माहेश्र्वरी समाजाचे बांधकाम व्यावसायीक संजय बिहाणी यांची त्यांच्या घराजवळ गाडीतून उतरत असतानां मोटार सायकल वरुण आलेल्या गुंडानी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना ठार मारले या घटनेचा नांदगाव माहेश्र्वरी प्रगती मंडळाने निषेध केला असून तहसिल कार्यालयात प्रशासन नायब तहसिलदार श्री मोरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की माहेश्वरी समाज हा शांतताप्रिय समाज असून कायद्याची बुज राखणारा देशाच्या व राज्याच्यां महसुलात मोठे योगदान देणारा समाज आहे. अशा आमच्या समाजाचे नांदेड येथील दानशुर व्यक्तीमत्व प्रसिध्द बांधकाम व्यावसायीक संजय बियानी यांची दिवसाढवळया जी निघृण हत्या झाली त्याचा आम्ही निषेध करतो . हल्लेखोरानां व सुत्रधारानां त्वरीत अटक करून कायदेशीर कारवाई करावी . यावेळी रामनिवास करवा ‘ प्रकाश कलंत्री ‘ अमोल नावदंर ‘ भुषण धुत ‘ सागर फोफलिया ‘ यज्ञेश कलंत्री ‘ नंदन करवा ‘ केतन करवा ‘ आनंद गांधी’ अमित चांडक ‘ सुशील फोफलिया ‘ गोविंद फोफलिया ‘ आदी उपस्थीत होते

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]