Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Apr 13, 2022

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल व सेंट झेवियर स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 18 एप्रिल ते 14 मे 2022 या कालावधीत उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे शिबिर येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या प्रशस्त मैदानावर सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत आयोजित करण्यात असून या शिबिरात बास्केटबॉल व फुटबॉलचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे .या प्रशिक्षणासाठी २५० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार असून पालकांच्या संमती पत्रा शिवाय इच्छुकांना या शिबिरास प्रवेश घेता येणार नाही. प्रवेश फॉर्म साठी इच्छुकांनी श्री. दिवाकर दोंदे (9561952814), श्री. सुधाकर कातकडे(9405563257), श्री. दत्तू जाधव (9923937476),श्री. स्वप्नील बाकळे(9762627087) यांच्याशी संपर्क साधावा .तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे,असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक फादर सॅबी कोरिया यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा दिलासा – इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणार गुण

बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा दिलासा – इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणार गुण

सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या पेपरमधील त्रुटींबाबत महत्त्वपूर्ण...

read more
कविता राऊत, दत्तू भोकनळ आणि अंजना ठमके या खेळाडूंची होणार शासकीय सेवेत थेट नियुक्ती – गिरीश महाजन

कविता राऊत, दत्तू भोकनळ आणि अंजना ठमके या खेळाडूंची होणार शासकीय सेवेत थेट नियुक्ती – गिरीश महाजन

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचा नावलौकिक वाढवून देशासाठी पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना शासकीय...

read more
सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासून दान पेटीतील रक्कम चोरीला – सप्तशृंगी गड येथील घटना

सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासून दान पेटीतील रक्कम चोरीला – सप्तशृंगी गड येथील घटना

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवी गडावरील मंदिरात दानपेटीतून चोरी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]