loader image
[ays_poll id=7]

तीन हजार पुस्तके वापरत साकारली बाबासाहेबांची प्रतिकृती चांदवड चे कलाशिक्षक देव हिरेंचे महामानवास अनोखं अभिवादन

Apr 13, 2022

१४ एप्रिल अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. पुस्तकांसाठी भव्य असं घर बांधणाऱ्या या महामानवाने अवघ आयुष्य पुस्तक लिहिण्यात अन वाचनात खर्ची केलं अन देशाला एक परिपूर्ण असं संविधान दिलं. ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश देत त्यांनी समाजाला वाचनाची प्रेरणा दिली. हाच धागा पकडत यंदाच्या जयंतीनिमित्त तब्बल तीन हजार पुस्तकांचा वापर करत साडेपाच हजार चौरस फुट शालेय मैदानात बाबासाहेबांची आकर्षक प्रतिकृती साकारत देव हिरे यांनी महामानवास अनोखं अभिवादन केलं आहे.

शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव ता. चांदवड च्या प्रांगणात ही भव्य अशी कलाकृती साकारली असून त्यासाठी मुख्याध्यापक श्री.कृ.बा.लोखंडे, पर्यवेक्षक श्री.आ.वि. सोनवणे. यांच्या मार्गदर्शनातून हिरे यांनी ही कलाकृती दोन दिवसांत तब्बल बारा तास भर उन्हात उभं राहत आपली कलाकृती पूर्णत्वास नेली. यात तीन हजार पुस्तकांचा वापर झाला असून विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश देखील दिला आहे. याउपक्रमात चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून हर्षद गवळी, हेमंत मोरे, योगराज खैरणार या विद्यार्थ्यांनी तसेच सहाय्य्क शिक्षक श्री. अनिल बहिरम, व ग्रंथपाल राजेंद्र आहेर यांनी देव हिरे यांना विशेष सहकार्य केलं आहे.

नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमांनी विविध सण उत्सव साजरे करणारे देव हिरे सर या उपक्रमाने आणखी प्रकाशझोतात आले असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संयम, एकाग्रता अन कलेची तपस्या त्यांच्या या कलाकृतीतून अधोरेखित होत असल्याचं अनेकांनी बोलून दाखवल.

अजून बातम्या वाचा..

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.