Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

चांदवड पॉलिटेक्निक तर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन

Apr 14, 2022

चांदवड येथील महिलांसाठी श्री. एच. एच.जे.बी. तंत्रनिकेतनतर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पॉलीटेक्निक चे मार्गदर्शक व समन्वयक माननीय श्री अरविंद जी भन्साळी व माननीय श्री राजकुमारजी बंब यांच्या संकल्पनेतून समाजासाठी उपयोगी हा उपक्रम राबवला.सार्वजनिक वाचनालय,चांदवड येथे आज दिनांक 13 एप्रिल रोजी चांदवड येथे ही स्पर्धा संपन्न झाली.यासाठी महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सौ एम. एम .वाघ ,कु.अंकिता डुंगरवाल,सौ.दीपिका खर्गे,सौ. ऊर्मिला काळे यांनी योगदान दिले.याप्रसंगी सौ. लिलाबाई डुंगरवाल, सौ. पुष्पाबाई लोढा,सौ. मीनाताई कोतवाल,सौ. सुरेखा संचेती, सौ.ज्योती ब्रह्मेचा, श्रीमती.भारतीताई देशमुख,सौ रिंकू कासलीवाल ,सौ.मंगल डुंगरवाल, सौ. अर्चना डुंगरवाल,सौ.सूचिता डुंगरवाल,सौ. वंदना आचलिया सौ.नमिता निकम आदी मान्यवर उपस्थित होते.परिक्षक म्हणून सौ.कविता सोनवणे आणि प्रीती सैनी उपस्थित होते.
.प्रथम क्रमांक सौ. प्रिया क्षत्रिय, द्वितीय क्रमांक रितिका डुंगरवाल, तृतीय क्रमांक सौ.तृप्ती गुजराथी यांनी मिळवला.उपक्रमासाठी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर विशाल वानखेडे सर उपप्राचार्य श्री एस एच गौडा* सर विभाग प्रमुख श्री डी व्ही लोहार कुमारी ए एस चोरडिया श्री एन आर ठाकरेयांनी मार्गदर्शन केले.
विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक मा. श्री अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी, व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य मा. श्री राजेंद्रकुमारजी बंब यांनी या आयोजनाबद्दल संबंधितांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

सार्वजनिक शिवजयंती च्या अध्यक्ष पदी आमदार सुहास आण्णा कांदे तर कार्याध्यक्षपदी मयूर बोरसे यांची निवड

सार्वजनिक शिवजयंती च्या अध्यक्ष पदी आमदार सुहास आण्णा कांदे तर कार्याध्यक्षपदी मयूर बोरसे यांची निवड

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची बैठक काल हिरूभाऊ गवळी मंगल कार्यालय मनमाड येथे संपन्न झाली. सन...

read more
प्रजासत्ताकदिनी प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने जातेगावला विद्यार्थिनीचा मृत्यू

प्रजासत्ताकदिनी प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने जातेगावला विद्यार्थिनीचा मृत्यू

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालयात...

read more
बघा व्हिडिओ – मनमाड ला गणेश जयंतीनिमित्त निलमणी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

बघा व्हिडिओ – मनमाड ला गणेश जयंतीनिमित्त निलमणी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]