loader image
[ays_poll id=7]

कोल्हापूर उत्तर मध्ये महविकास आघाडीच्या जयश्री जाधव विजयी

Apr 16, 2022


कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला. भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव करत जयश्री जाधव कोल्हापुरातील पहिल्या महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान त्यांनी मिळवला. तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं.

जयश्री जाधव यांनी सत्यजीत कदम यांचा १८ हजार ८०० मतांनी पराभव केला. जयश्री जाधव यांना २६ फेरीअखेर ९६ हजार २२६ मतं मिळाली. तर सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मतं मिळाली.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागली होती. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांमना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यावेळेसच्या पोटनिवडणुकीत दोन्हा बाजूंनी जोरदार प्रचार केला. दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे निकालाची उत्सुकता होती. या निवडणुकीत काँग्रेससह भाजपच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे  जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

  नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा....

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

❗❗🚩🚩 मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.