गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आकर्षक पुतळा येणाऱ्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नांदगाव शहरातील नियोजित ठिकाणी स्वखर्चाने उभारणार असल्याचे पत्रक येथील अखिल भारतीय मराठा महासंघच्या वतीने प्रसिद्धीस दिले आहे. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी काशी, मथुरा, सोमनाथ अशा जगविख्यात प्रसिद्ध पुरातन मंदिरांचे जीर्णोद्धार करून ठिकठिकाणी प्रवासी, यात्रेकरू, वाटसरुंसाठी धर्मशाळा, घाट बांधले विहिरी खोदल्या अनेक मंदिरांचे नवनिर्माण करीत आपल्या कार्यकर्तृत्ववर दैवत्व प्राप्त केले अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा चौथरा नांदगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बांधून तयार असून सुध्धा शासन, प्रशासन आणि लोप्रतिनिधिंकडून या विषयी अनास्था बाळगली जात असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.












