Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

“भीमोत्सव 22” चा ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ या महानाट्याने समारोप

Apr 17, 2022

मनमाड : महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने दरवर्षी शहरावासीयांना नावाजलेल्या कार्यक्रमांची मेजवानी देऊन भीमोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते.

यंदाच्या वर्षी देखील दिनांक 11 एप्रिला शाहिरी जलसा , 12 एप्रिला जागर समतेचा आणि 16 एप्रिला भीमा तुझ्या जन्मामुळे महानाट्य या नावाजलेला कार्यक्रमांचे आयोजन “भीमोत्सव 22” ला आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले होते , या सर्व कार्यक्रमांना शहरातील भीम प्रेमींनी भर-भरून दाद देऊन उपस्थिती लावली.

महामानव , भारतरत्न , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतिशय संघर्षमय जीवनावर आधारित ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ या चाळीस कलाकारांच्या अतिशय जीवंत असणाऱ्या अभिनयाने नटलेल्या या महानाट्याने मनमाडकरांची मने जिंकुन घेतली , दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी पोलीस परेड ग्राऊंड येथे प्रा.प्रकाशकुमार मधुकर वाघमारे दिग्दर्शित भीमा तुझ्या जन्मामुळे या महानाट्याचे आयोजन भीमोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते .बाबासाहेबांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाण दिन होण्यापर्यंतचे सर्व जीवन प्रसंग या महानाट्यामध्ये दाखवण्यात आले . बाबासाहेबांचा जन्म , शिक्षण घेत असताना केलेला संघर्ष , त्या काळातील जाती व्यवस्था , उच्च शिक्षण घेण्यासाठी केलेले अथक प्रयत्न , चवदार तळ्याच्या पाण्यासाठी करण्यात आलेला संघर्ष , काळाराम मंदिर प्रवेशासाठी करण्यात आलेले आंदोलन , भारत देशाच्या संविधान निर्मितीसाठी घेण्यात आलेली दिवस-रात्रीचे कष्ट , महापरिनिर्वाण दिन आदी बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक महत्वाचे प्रसंग या नाटकातील कलाकारांनी अतिशय उत्तम रित्या सादर केले , नाटक बघत असतांना उपस्थित प्रेषकवर्ग भावुक होऊन नाटकातील घटना प्रत्यक्ष अनुभवताना आपल्या डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून देत होते."भीमोत्सव 22" च्या सर्वच कार्यक्रमांना शहरातील मान्यवर , भीमोत्सवाचे देणगीदार , भीमप्रेमी आणि नागरिकांनी भर-भरून साथ देऊन उपस्थिती लावल्या बद्दल

भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे – राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची चौकशीची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे – राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची चौकशीची मागणी

मनमाड शहरातील नियोजीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे...

read more
ठाकरे गटाचे युवासेना उप तालुकाप्रमुखसह तरुणांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

ठाकरे गटाचे युवासेना उप तालुकाप्रमुखसह तरुणांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गट शिवसेना या पक्षाचे युवासेना तालुका उपप्रमुख...

read more
बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

आज सकाळी मनमाड हून जवळच असलेल्या अनकाई किल्ल्यावर इंद्रध्वज चे अप्रतिम दृश्य मनमाड चे प्रसिद्ध...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]