Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे आ.सुहास कांदे यांचे हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न

Apr 18, 2022


नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील चर्मकार समाजाच्या विनंतीवरून रोहिदास वाडा वस्तीवरील श्री लक्ष्मी माता मंदिर समोरील जागेवर आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सभामंडपाचे भूमिपूजन आज ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, आ. कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापूसाहेब कवडे होते.
आ.कांदे यांचे मांडवडकरां तर्फे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने मांडवड ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.
चर्मकार समाजातील ज्येष्ठ सदस्य माजी चेअरमन श्री.सुदाम आहेर यांनी आपल्या भाषणात बोलताना माझी हयात काँग्रेस पक्षा सोबत गेली, मी आजपर्यंत खूप आमदार पाहिले पण सुहास आण्णांसारखा आमदार पहिल्यांदा पाहत आहे, आम्ही सभामंडपाची मागणी करण्यासाठी आण्णांच्या घरी जायचे ठरवले तेव्हा प्रश्न पडला की आपण तर आयुष्यभर काँग्रेस पक्षाचे काम केले, शिवसेनेचे काम कधी केलेच नाही तर कसे जायचे, पण आमदारांना भेटल्यावर आमची मागणी मांडत नाही तोच आमदारांनी तुमच्या सर्व अडचणी मी लगेच सोडवतो आणि सभामंडपाला लगेच उद्यापासून सुरुवात करतो असे सांगितल्यावर मला विश्वासच बसला नाही असे मत व्यक्त केले.
आ .कांदे यांनी आपल्या भाषणात बोलताना आमदारकीच्या निवडणुकीत प्रचाराचा पहिला नारळ मांडवड गावातील हनुमान मंदिर येथे फुटला होता आणि बजरंग बलीच्या आशीर्वादाने आज मी आमदार आहे याची आठवण त्यांनी करून दिली. मांडवड गावातील कोण कोणत्या पक्षात काम करतो हे प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य असून आपल्याला लोकशाहीने अधिकार दिले आहेत. पण मी मतदार संघाचा आमदार आहे आणि संपूर्ण मतदार संघाच्या गावाची किंवा तेथील नागरिकांचे प्रश्न सोडवणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी प्रामाणिकपणे करत आहे आणि करत राहीन, यापुढेही मांडवड गावातील रस्ते फरशी सभामंडप किंवा ईतर ही विकास कामे प्राधान्यक्रम देऊन केले जातील असा विश्वास यावेळी उपस्थितांना त्यांनी दिला.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे प्रमोद भाबड अमोल नावंदर कृषी अधिकारी श्री पाटील साहेब डॉक्टर प्रवीण निकम,विठ्ठल आहेर, सुशील आंबेकर,अशोक निकम, सरपंच अंकुश डोळे, इंजिनीयर सागर आहेर, रोशन आहेर,बापू आहेर आदींसह मांडवड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सुदाम आहेर पांडुरंग आहेर संतोष आहेर ‘कैलास आहेर’ महादू आहेर’ माणिकराव आहेर ‘त्र्यंबक आहेर ‘शांताराम आहेर’ संजय आहेर ‘प्रकाश आहेर’ मधुकर गाठबांधे ‘योगेश आहेर संत शिरोमणी रोहिदास महाराज मित्र मंडळ मांडवड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिताराम पिंगळे यांनी केले

अजून बातम्या वाचा..

विधिमंडळ हे तर चोर मंडळ ; संजय राऊत यांचे वादग्रस्त विधान – हक्कभंगाची कारवाई होणार ?

विधिमंडळ हे तर चोर मंडळ ; संजय राऊत यांचे वादग्रस्त विधान – हक्कभंगाची कारवाई होणार ?

विधीमंडळ हे तर 'चोर'मंडळ आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना गट आणि भाजपवर...

read more
सोशल मीडियावर बंधने तर बँकांच्या कर्ज आणि ईएमआय देतांना मोजावी लागणार जास्त रक्कम – आज पासून झाले बदल

सोशल मीडियावर बंधने तर बँकांच्या कर्ज आणि ईएमआय देतांना मोजावी लागणार जास्त रक्कम – आज पासून झाले बदल

दर महिन्याला आर्थिक बाबतीत काही बदल होत असतात. मार्च महिन्यात सुद्धा काही महत्त्वाचे बदल होणार...

read more
सर्व सामान्यांना होळी पूर्वीच महागाईचा चटका – घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागले

सर्व सामान्यांना होळी पूर्वीच महागाईचा चटका – घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागले

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच...

read more
जिल्हा बँकेतील ठेवीदारांच्या रकमा परत मिळाव्यात – भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन करणार ८ मार्च रोजी वस्त्र त्याग धरणे आंदोलन

जिल्हा बँकेतील ठेवीदारांच्या रकमा परत मिळाव्यात – भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन करणार ८ मार्च रोजी वस्त्र त्याग धरणे आंदोलन

मा. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नाशिक यांच्या कार्यालया समोर नाशिक येथे लोकशाही व अहिंसेच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]