राज्यात कुठे ही भारनियमन नाही ह्या राज्य सरकारच्या घोषणेला हरताळ फासत मनमाड शहरात महावितरण कंपनी ने तब्बल साडेतीन तास भारनियमन करण्यात येणार असल्याचे वेळापत्रक प्रसिद्धीला दिले असून ह्या भारनियमनाचे मनमाड कर नागरिकांनी, व्यापारी बांधवांनी तीव्र निषेध नोंदविला असून हे भारनियमन त्वरित रद्द करावे अशी मागणी होत आहे
ह्या भारनियमन वेळापत्रकाचा परिणाम नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा वेळापत्रकावर होणार असून ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई सोसणाऱ्या मनमाडकरांना आता ह्या भारनियमनामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असे चित्र दिसत आहे














