loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २२ एप्रिल २०२२ !

Apr 22, 2022


मेष :- भविष्याची फार चिंता करू नका. काही प्रश्न लवकरच निकाली निघतील.

वृषभ :- मनात उगाच नसत्या चिंता आणू नका. वेळेचा सदुपयोग करावा.

मिथुन :- तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कौतुकाने अधिक चांगली प्रेरणा मिळेल.

कर्क :- आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. एखादी नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते.

सिंह :- आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल.

कन्या :- अनपेक्षित लाभ मिळू शकतात. द्विधा मनस्थितीतून बाहेर यावे.

तूळ :- इतरांवर तुमची चांगली छाप पडेल. कामाच्या ठिकाणी आज चांगले परिणाम पहायला मिळतील.

वृश्चिक :- आज  मनाची संवेदनशीलता दाखवाल. शब्दांचे वजन लक्षात घ्यावे. मन विचलीत होऊ देऊ नका.

धनू :- आजचा दिवस प्रसन्नतेत जाईल. मनातील इच्छापुर्तीचा दिवस.

मकर :- आपली क्षमता ओळखून काम करावे. अति स्पष्ट बोलणे टाळावे.

कुंभ :- तुमच्या हातातील काम पूर्ण होईल. पराक्रमाला चांगला वाव आहे.

मीन :- आपले मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी ध्यान करावे. व्यायामाला कंटाळा करू नका.


अजून बातम्या वाचा..

.