Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दौलताबाद – पोटुळ जवळ सिग्नल ला कापड बांधून देवगिरी एक्स्प्रेस वर सशस्त्र दरोडा

Apr 22, 2022

औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर 8 ते 10 जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली आहे, मध्यरात्री दौलताबाद-पोटूळ दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. चक्क सिग्नलला कापड बांधून रेल्वे थांबवून आठ ते दहा जणांच्या टोळीने लुटमार केल्याची माहिती मिळत आहे. जवळपास अर्धा तास हा सगळा प्रकार सुरू होता. दरम्यान एक महिलेच्या गळ्यातील चैन आणि इतर वस्तू चोरल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे, रेल्वे डब्बा S5 ते S9 वर दगडफेक करण्यात आली असून घटनास्थळी ॲम्बुलन्स देखील उभी होती दरम्यान हे दरोडेखोर ॲम्बुलन्समधून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, 5 एप्रिल रोजी अशाच प्रकारे नंदीग्राम एक्स्प्रेस आणि नांदेड मनमाड पॅसेंजर रेल्वे थांबवून लुटमार केल्याची घटना घडली होती.

यापूर्वीही नंदीग्राम एक्स्प्रेस-नांदेड मनमाड पॅसेंजर रेल्वे थांबवून लुटमार

औरंगाबाद येथे मुंबई-नांदेड नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडीला पोटूळ रेल्वे स्टेशनजवळ लाल दिवा दाखवून थांबवून रेल्वेत घुसलेल्या चार ते पाच दरोडेखोरांनी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, तर मोबाईल हिसकावल्याची घटना घडल्यानंतर 5 एप्रिलला शुक्रवारी रात्री 12.55 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती देऊनही पोलीस यंत्रणा सक्रिय न झाल्याने रात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास नांदेड-मनमाड या पॅसेेंजर रेल्वेला अशाच प्रकारे थांबवून दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून प्रवाशांना लुटल्याची दुसरी घटना घडल्याने प्रवाशांत खळबळ उडाली. याप्रकरणी औरंगाबाद लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मुंबईहून औरंगाबाद मार्गे नांदेडला निघालेली नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडी शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन येथून औरंगाबादकडे येत होती. त्यावेळी देखील पोटूळ रेल्वे स्टेशन येथील ग्रीन सिग्नलला दरोडेखोरांनी कपडा बांधून झाकले. यामुळे केवळ लाल सिग्नल रेल्वे मोटारमनला दिसल्याने स्टेशनजवळच चालकाने गाडी थांबविली. गाडी थांबताच धारदार शस्त्रे घेऊन रेल्वेतील एका डब्यात घुसलेल्या दरोडेखोरांनी प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करण्यास सुरुवात केली होती.

अजून बातम्या वाचा..

शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट  आऊट स्टँडींग अवॉर्ड

शिक्षणाला जोड मेहनतीची – मनमाड च्या सुशील पवारने अमेरिकेत शिष्यवृत्तीच्या जोरावर शिक्षण घेत मिळविला बेस्ट आऊट स्टँडींग अवॉर्ड

अनेकांनी स्वप्न पाहिलेले असते की परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं मात्र हे स्वप्न सत्यात उतरवणे...

read more
दिड वर्षाच्या बाळाला मण्यार जातीच्या सापाचा चावा – डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने वाचले चिमुकल्याचे प्राण

दिड वर्षाच्या बाळाला मण्यार जातीच्या सापाचा चावा – डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने वाचले चिमुकल्याचे प्राण

दीड वर्षाचे बाळ आपल्या आईच्या कुशीत शांत झोपला असताना रात्रीच्या अंधारात सळसळणारा मण्यार जातीचा...

read more
मनमाड जळगाव स्थानकादरम्यान १४,१५ ऑगस्ट रोजी मेगब्लॉक – अनेक गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात बदल

मनमाड जळगाव स्थानकादरम्यान १४,१५ ऑगस्ट रोजी मेगब्लॉक – अनेक गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात बदल

मनमाड-जळगाव स्थानकादरम्यान मेगाब्लॉकमुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून या काळात प्रवाशांना...

read more
नवक्रांतीची ज्योत तेवत ठेवा ,क्रांती दिनी निर्धार नवक्रांती युवक सघांचा ५ वा वर्धापन दिन उत्सवात साजरा

नवक्रांतीची ज्योत तेवत ठेवा ,क्रांती दिनी निर्धार नवक्रांती युवक सघांचा ५ वा वर्धापन दिन उत्सवात साजरा

नांदगाव प्रतिनिधी देशावर,राज्यावर बोलण्यापेक्षा गावावर बोला आणि क्रांतीदिन साजरा करतांना ज्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]