Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अखिल भारतीय मराठा महासंघ सदैव धनगर समाजासोबतच : भीमराज लोखंडे

Apr 23, 2022

गेल्या २५ वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आकर्षक पुतळा नांदगाव शहरात नियोजित ठिकाणी स्थापित करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ प्रयत्नांची पराकाष्टा करीत असून अनेक ठिकाणच्या पुतळ्यांची माहिती संकलित करण्यात आलेली आहे
नांदगाव नगरपालिकेच्या दप्तरी असलेल्या ठरावांच्या,नकला व इतर अनुषंगिक दस्तऐवजनसह,ना हरकत पत्र,एन ओ सी तात्काळ मागण्यात आली आहे.सदर कार्य तडीस जाण्यासाठी सर्व समाज बांधवांना विश्वासात घेऊन सर्वांची मदत व सहकार्य घेऊनच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये.अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वरिष्ठ कार्यकारिणीलाही याची संपूर्ण माहिती देण्यात आली असून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेंद्र कोंढरे साहेब व नाशिक जिल्हा अध्यक्ष माननीय अशोक काका कदम यांची योग्य त्या ठिकाणी मदत घेण्यात घेतली जाणार आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत तसेच नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सहकार्याची व मदतीची आपली भावना बोलून दाखविली असून त्यांची ही मोठी मदत या कामात होणार आहे. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. अखिल भारतीय मराठा महासंघ ही संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी अ राजकीय संघटना आहे.संघटना कोणतीही निवडणूक लढवत नाही. संघटना कोणतीही जात पात मानत नाही. अशी आमची भूमिका आम्ही स्पष्टपणे जाहीर करतो.वास्तविक राष्ट्रपुरुष हे कोणत्याही जाती-धर्माचे नसतात ती एक राष्ट्रीय संपत्ती असते आणि त्यावर सर्व जाती-धर्माच्या समाजाचा समान अधिकार असतो आमच्यासाठी सर्वच आदरणीय आहेत.आमची श्रद्धास्थाने आहेत छत्रपती शिवाजी महाराज जसे आपल्या कार्यकर्तृत्ववर बहुजन समाजाचे दैवत झाले तसेच स्त्रीयांमधील लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या होळकर शाहितील लोकहिताची कामे इतकी प्रचंड आहेत की रयतेने त्यांना देवीची उपमा बहाल केली.अशा दैवताचा आकर्षक पुतळा नियोजित ठिकाणी स्थापित व्हावा या स्वच्छ व प्रामाणिक हेतूने आम्ही प्रयत्न करीत आहोत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमचा पाठिंबा आम्ही यापूर्वीच मनमाड शहरातील धनगर समाज मेळाव्यात जाहीर केलेला आहे. भविष्यात धनगर आरक्षणाबाबत होणाऱ्या आंदोलनात आमचा सक्रिय सहभाग राहील अशी ग्वाही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने देण्यात येत आहे तरी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मदतीने व सहकार्याने हे सत्कार्य घडो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो असे कळकळीचे आवाहन मराठा महासंघाचे नांदगाव तालुकाध्यक्ष भिमराज लोखंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिले आहे.

अजून बातम्या वाचा..

नॅशनल रेल्वे मजदुर युनियन ची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे कर्षण मशिन कारखाना विस्तारीकरणाची मागणी

नॅशनल रेल्वे मजदुर युनियन ची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे कर्षण मशिन कारखाना विस्तारीकरणाची मागणी

  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे दि 30-06-2023 शनिवारी नाशिक रोड स्टेशनला स्लीपिंग...

read more
नांदगाव शिवस्फूर्ती मैदान येथे आमदार आपल्या दारी शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद

नांदगाव शिवस्फूर्ती मैदान येथे आमदार आपल्या दारी शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद

नांदगाव सोमनाथ घोंगाणे आमदार सुहास कांदे यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चातून आमदार आपल्या दारी एक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]