Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आ. मिटकरी यांनी माफी न मागितल्यास जिल्ह्यात फिरकू देणार नाही : ब्राम्हण समाजाचा इशारा

Apr 24, 2022

आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाची टिंगल करत खिल्ली उडविल्याचा निषेधार्थ येथील संतप्त पुरोहित व ब्राम्हण समाजाने आंदोलन करून मंडल अधिकारी भिकन नरोटे यांना निवेदन देऊन आ.मिटकरी यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी मोठ्या संख्यने समाजबांधव उपस्थित होते.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात गत अनेक दिवसांपासून जातीयवाद पेरण्याची काही लोकप्रतिनिधीनी धुरा हाती घेतली आहे. यात विद्यमान आमदार अमोल मिटकरी यांनी १२ दिवसांपूर्वी एका सभेत पुजारी, पूजा,  पाठ, पौराहित्य करणाऱ्या ब्राम्हणांची टिंगल करत खिल्ली उडविल्याचा तसेच सनातन हिंदू धर्मातील पवित्र कन्यादान विधीचा चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा व विपर्यास केल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी आ.अमोल मिटकरी यांना साथ दिली. त्यामुळेच हा जातीयवाद पेरण्याचा विषय लोकप्रतिनिधीमध्ये आला असून या जातीयवादी वक्तव्य करत चमकोगिरी करूऱ्या लोकप्रतिनिधीवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी निवेदनात केली आहे आ.अमोल मिटकरी यांनी पौराहित्य करणाऱ्या पुरोहितांची माफी मागितली पाहिजे. त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.  जातीयवाद पेरणारे लोकप्रतिनिधी माफी मागणार नसतील आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर या लोकप्रतिनिधीला राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात फिरकू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी समीर कुलकर्णी, युवराज बळेल, स्नेहल भागवत, विनया पाठक, व्ही व्ही पुरंदरे, वसंत जोशी,  चिन्मय पाठक, विवेक हातेकर, प्रकाश कुलकर्णी, सुहास मटकर, एस आर भागवत, सुषमा तिवारी, उमेश कुलकर्णी, आशितोष गाडगीळ, आदित्य कांडलीकर, एन के देशपांडे, हेमंत लाळे आदीसह श्री.परशुराम प्रतिष्ठानचे पदाधिकारी,कार्यकर्ते व समस्त समाजबांधव उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]