Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

हेराक्लिओन ग्रीस येथील जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी तृप्ती पाराशर हिची निवड

Apr 25, 2022

हेराक्लिओन ग्रीस येथे होणाऱ्या जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी भारतीय ज्युनिअर मुलींच्या प्रशिक्षक म्हणून जय भवानी भवानी व्यायाम शाळेची खेळाडू व एन आय एस कोच तृप्ती शेखर पाराशर हिची निवड करण्यात आली आहे
29 एप्रिल ते 12 मे दरम्यान हेराक्लिओन ग्रीस येथे होणाऱ्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून निवड झालेली तृप्ती पाराशर ही महाराष्ट्राची व नाशिक जिल्ह्यातील व मनमाड च्या क्रीडा इतिहासात तील वेटलिफ्टिंग या खेळाची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षक म्हणून निवड झालेली पहिलीच प्रशिक्षक ठरली आहे,समस्त मनमाड कर तसेच महाराष्ट्र व नाशिक जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाची बाब असून उत्कृष्ट खेळाडू म्हणून राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक असलेली तृप्ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षक म्हणून छाप पाडण्यास सज्ज झाली आहे.आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल तृप्ती चे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन तृप्तीस लाभले असून,आपला खेळाडू प्रशिक्षक होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत असल्या बद्दल मनमाड मधील सर्व वेटलिफ्टिंग च्या खेळाडूंनी तृप्ती चे मनपूर्वक अभिनंदन केले असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]