मेष :- योग्यप्रकारे आकलन करून आपले विचार योग्य प्रकारे मांडाल. अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल.
वृषभ :- तुमच्या मताचा आदर केला जाईल. तुमचा रुबाब राहील.
मिथुन :- हातात काही नवीन गोष्टी येतील. सढळपणे इतरांना मदत कराल.
कर्क :- आपल्याच मतावर आग्रही राहाल. आवडी-निवडीबाबत ठाम भूमिका घ्याल.
सिंह :- तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. वागण्यातून इतरांवर चांगली छाप पाडाल.
कन्या :- स्वबळावर विश्वास ठेवावा. स्वभावात काहीसा कठोरपणा येईल.
तूळ :- आर्थिक जबाबदारी वाढेल. गोष्टींची उपयुक्तता लक्षात घ्यावी. अधिकारात वाढ संभवते.
वृश्चिक :- ऊर्जेने कामे हाती घ्याल. स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल.
धनु :- इतरांचे कौतुक कराल. उत्कृष्ट काव्यस्फूर्ती लाभेल.
मकर :- गायन कलेला चांगला वाव मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल.
कुंभ :- फॅशनची हौस पूर्ण करता येईल. उत्तम व्यक्तिमत्वाची छाप पडेल.
मीन :- प्रवासात काळजी घ्यावी. स्वकष्टावर कामे करण्याकडे कल राहील.




