loader image
[ays_poll id=7]

राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेस पोलिसांनी दिली परवानगी; ह्या असतील टर्म्स अँड कंडिशन्स

Apr 29, 2022

1 मे रोजी राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेच्या अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देताना पोलिसांनी काही अटी देखील घातल्या आहेत. या सभेला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 16 अटी लागू घाला आहेत. पोलिसांनी या सभेला परवानगी दिल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, पोलिसांनी घातलेल्या अटी व शर्तीचे निश्चितपणे पालन केले जाणार आहे.

सभेला फक्त 15 हजार लोकच जमू शकतील यात एक महत्वाची अट पोलिसांनी घातली आहे. ज्यामध्ये या सभेला फक्त 15 हजार लोकच जमू शकतात, कारण ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे, त्या सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदानाची क्षमता ही 15 हजार लोकांचीच असल्याचं पोलिसांचे म्हणणे आहेत. यावर बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले आहेत की, असं असलं तरी सुद्धा येणाऱ्या लोकांना कोणी थांबू शकत नाही. त्याच प्रमाणे जितकी लोक येथील त्यांना कसं सावरायचं आणि आवरायचं हे पोलिसांच्या मदतीने आम्ही करू, असं ते म्हणाले आहेत. तसेच उद्या मनसेच शिष्ट मंडळ हे या सभे संबंधित औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी बोलता दिली आहे.

या अटींचे करावे लागले पालन

  1. सभा संध्याकाळी 4.30 ते रात्री 21.45 वेळेतच आयोजित करावी, कार्यक्रमात कोणताही बदल करु नये
  2. वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म यावरुन चिथावणी देणारं विधान करु नये
  3. सभेत कुणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करु नये
  4. सभेसाठी पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा, निर्धारित ठिकाणीच पार्किंग करावं
  5. कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये किंवा प्रदर्शनही करु नये
  6. अट 2, 3 आणि 4 बाबत सभेत सहभागी होणाऱ्यांना आयोजकांनी कळवावे
  7. सभेतील स्वयंसेवकांची नावे, मोबाईल नंबर तसेच बाहेरुन येणाऱ्यांची अंदाजित संख्या एक दिवस अगोदर पोलिसांना कळवावी
  8. सभेसाठी 15 हजारहून अधिक लोकांना निमंत्रिक करु नये, काही गोंधळ झाल्यास आयोजक जबाबदार राहतील
  9. सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी निर्देशित केलेल्या जागी बॅरिकेट्स उभारावे
  10. सभेसाठी आवाजाची मर्यादा 75 डेसिबल इतकी ठेवावी लागणार
  11. सभेदरम्यान अत्यावश्यक सुविधांना बाधा येणार नाही, याची काळजी घ्यावी.
  12. सभेच्या दिवसी वाहतुकीसंदर्भातील अधिसूचना सभेला येणारे वक्ते, कार्यकर्ते यांना बंधनकारक असेल.
  13. सभेसाठीच्या वस्तू, जनरेटरची व्यवस्था आधीच करावी.
  14. सभेदरम्यान अन्नदान किंवा मिठाई वाटप होणार असेल, तर त्यातून विषबाधा होणार नाही, याची काळजी घ्यावी.
  15. कार्यक्रमाचं ठिकाण किंवा वेळ यामध्ये कोणताही बदल करू नये.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.