loader image
[ays_poll id=7]

एस ए डब्लू संघाने पटकाविला वर्कशॉप प्रीमियर लीग चषक

Apr 29, 2022


भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंती निमित्त सेंट्रर रेल्वे मजुदर संघ कारखाना शाखा, मनमाड तर्फे वर्कशॉप प्रिमियर लिगचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा अंतिम सामना जी.एस.एस.पँथर व एस. एक.डब्ल्यु.किंग ११ या दोन संघांमध्ये झाला.
जी.एस.एस.पँथर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
एस.ए.डब्ल्यु.संघाने ८ षटकात ८८ धावा केल्या.तर जी.एस.एस.पँथर८ षटकात ५४ धावाच करु शकले सदर स्पर्धेमध्ये एस.ए.डब्ल्यु.संघाने प्रथम क्रमांक पटकावले .जी.एस.एस.पँथर या संघाने द्वितीय पटकावले तर तृतीय क्रमांक फायनल टायगर या संघाने पटकावले तसेच चौथा क्रमांक बी टी एस बॉईज या संघाने पटकावला यावेळी प्रमुख पाहुणे सहाय्यक कारखाना प्रबंधक सहारे साहेब, पोलीस स्टेशनचे पीआय जोगदंड,सेंट्रल रेल्वे मजुदर संघ कारखाना शाखा चे अध्यक्ष प्रकाश बोडके, कारखाना शाखा चे सचिव नितीन पवार, असोसिएशन चे झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे,ए.एस.एस.टी.रेल्वे असोसिएशन कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, सिनियर सेक्सन इंजिनिअर संजय सोनवणे, सिनियर सेक्शन इंजिनिअर एकनाथ पाटील प्रविण बागुल,ओ.बी.सी.रेल्वे असोसिएशन कारखाना शाखा चे अध्यक्ष रतन निकम,रेल कामगार सेना चे संतोष पाटील, पत्रकार अमिन शेख,युवा अध्यक्ष वैभव कापडे आदी उपस्थित होते.
सदर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक चे ७०००/-₹चे बक्षीस डॉ.संजय सांगळे यांच्या तर्फे, द्वितीय क्रमांक चे ५०००/-₹ चे बक्षीस सेंट्रल रेल्वे मजदुर संघ कारखाना शाखा तर्फे तर तृतीय क्रमांक चे बक्षीस युवा नेते विशाल अहिरे यांच्या कडून ३०००/-₹ तर चतृर्थ बक्षीस २०००/-₹ वैभव कापडे यांच्या कडून तर सदर स्पर्धेसाठी पवण रॉय यांचे विशेष सहकार्य लाभले . सामनावीर म्हणून कल्याण धिवर यांची निवड करण्यात आली.मालिकावीर म्हणून शुभम हिरे यांची निवड करण्यात आली.सदर सामन्याला पंच म्हणून हरिष चौवरिया व प्रथमेश वाघ यांनी काम पाहिले तर सामन्यांचे धावते वर्णन महेंद्र चौथमल, प्रशांत महंगळ यांनी केले तर स्कोअरर म्हणून सुनिल शिंदे व मनोज पिंगळे यांनी काम केले.बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश हाडपे यांनी केले, सूत्रसंचालन महेंद्र चौथमल यांनी केले तर आभारप्रदर्शन मुक्तार शेख यांनी केले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अरूण कलवर, हेमंत माळी, हेमंत सांगळे, गिरीश पाटील, सोमनाथ सनस, गौतम वाघ, नागेंद्र शुक्ला, जयंत बोरसे, सोमनाथ राजनुर, विशाल महाजन,सागर हाडपे, दिपक सांगळे, संदिप घोरपडे, प्रितम मंत्री,प्रकाश सांगळे, अमोल खाडे, रमेश सिन्हा, संदिप मोरे, रविराज कांदे, इरफान बेग, संदिप पाटील, मधुकर सानप,दिपक बोरसे, ज्ञानेश्वर आहेर, योगेश शेरेकर,राम आहेर, प्रसाद लचके धनंजय सानप,इच्छाराम माळी, विक्रम आहेर,राजु खरे, सिताराम कुमावत, ज्ञानेश्वर बोडके,बाळू आहेर,नंदु कदम, सचिन सांळुके यांनी परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

नांदगाव - मारुती जगधने येथील योग प्रशिक्षक बाळू मोकळ यांनी चक्क बर्फाच्या थंड लादीवर ५१ योगासने व...

read more
मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

  मनमाड - आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि उत्तम...

read more
बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने  हत्याकांड –  पत्नी,मेहुणी,साडू,  सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या

बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने हत्याकांड – पत्नी,मेहुणी,साडू, सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या

नांदगाव : मारूती जगधने नांदगाव तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या घटनेचा...

read more
.