Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पंतप्रधान स्वानिधी योजना २०२४ पर्यंत सुरू राहील – अकबर शाह

Apr 30, 2022

आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी (पंतप्रधान स्वनिधी ) योजना अंतर्गत कर्जपुरवठा मार्च २०२२ नंतरही डिसेंबर २०२४ पर्यंत सुरु ठेवायला मंजुरी दिली असून, तारण -मुक्त वाढीव कर्ज, डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ आणि रस्त्यावरील विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबांचा सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकासावर भर देण्यात आला आहे.

या योजनेच्या माध्यमातून • रस्त्यावरील विक्रेत्यांना परवडणारी तारण-मुक्त कर्जे उपलब्ध करून दिली जात आहेत. या योजनेत ५,००० कोटी रुपये कर्ज देण्याची

कल्पना होती. आजच्या मंजुरीमुळे कर्जाची रक्कम वाढून ८, १०० कोटी रुपये झाली आहे. यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायाचा आणखी विस्तार करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून दिले जात आहे. विक्रेत्यांना कॅशबॅकसह डिजिटल पेमेंटच्या प्रोत्साहनासाठी वाढीव खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीमुळे देशातील शहरी

भागातील सुमारे १.२ कोटी नागरिकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान स्वनिधी अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. २५ एप्रिल, २०२२ पर्यंत, ३१.९ लाख कर्ज मंजूर केली आहेत आणि २,९३१ कोटी रुपयांची २९.६ लाख कर्ज वितरित केली आहेत. दुसऱ्या कर्जाच्या बाबतीत, २.३ लाख कर्ज मंजूर करण्यात आली असून ३८५ कोटी रुपयांची १.९ लाख कर्जे वितरित करण्यात आली आहेत. लाभार्थी फेरीवाल्यांनी १३.५ कोटींहून अधिक डिजिटल व्यवहार केले आहेत आणि त्यांना १० कोटी रुपयांचा कॅशबॅक देण्यात आला आहे. ५१ कोटी रुपये व्याजात सवलत म्हणून दिले आहेत.
अशी माहिती अकबर शाह : पथविक्रेता नियोजन समिती सदस्य मनमाड नगर पालिका यांनी दिली…

अजून बातम्या वाचा..

केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा :- डॉ भारती पवार

केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा :- डॉ भारती पवार

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमन योजनेअंतर्गत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

read more
वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

नांदगाव - सतत वारकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे कुटुंबप्रमुख या नात्याने आज तालुक्यातील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]